
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला होता. या विमान अपघातात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. आता ओडिशातील राउरकेला हवाई तळापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर एक विमान कोसळले आहे. उड्डाण घेतात या विमानात तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे पायलटने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला. या घटनेत पायलटला गंभीर दखापत झाली आहे. त्याला आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघात 6 जण जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार भुवनेश्वरहून राउरकेलाला जाणाऱ्या नाईन सीटर विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर काही काळात तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. टेकऑफनंतर सुमारे 10 किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले. हे विमान दुपारी 1:15 वाजता राउरकेला येथे उतरणार होते, मात्र त्यापूर्वीच त्याचे जालदाजवळ आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न झाला, मात्र यात पायलट गंभीर जखमी झाला आहे. ही घटना घडताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. विमानात अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. आता अघिकाऱ्यांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार या विमानात एकूण 6 जण प्रवास करत होते. यात चार प्रवासी आणि कॅप्टन नवीन कडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तव यांचा समावेश आहे. या घटनेत सर्व सहा जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातानंत या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर अग्निशमन दलाच्या तीन पथकांनी तातडीने बचावाला सुरुवात केली. स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनीही बचाव कार्यात मदत केल्याची माहिती समोर आली आहे.
या विमान अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या विमानानेआपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला. विमान खूप खाली उतरले होते. त्यानंतर विमान पुढे गेले आणि कोसळले. आता या विमान अपघातानंतर, अधिकारी आता हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास करत आहेत. या घटनास्थळाजवळ झाडे होती. जर विमान त्यात अडकले असते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र या अपघातातून सर्वजण बचावले आहेत.