AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India’s Gold Reserve: जगात सर्वाधिक सोनं कोणत्या देशाकडे? भारताचा नंबर कितवा? आकडा ऐकून…

भारतात सोन्याला फार महत्त्व आहे. कारण कोणताही कार्यक्रम किंवा सण असेल तर, भारतीय सोनं खरेदीला अधिक महत्त्व देतात... पण कोणत्या देशाकडे सर्वात जास्त सोन आहे आणि या यादीमध्या भारत कितव्या क्रमांकावर आहे, जाणून घ्या... आकडा जाणून व्हाल हैराण...

India's Gold Reserve:  जगात सर्वाधिक सोनं कोणत्या देशाकडे? भारताचा नंबर कितवा? आकडा ऐकून...
Gold
| Updated on: May 12, 2026 | 11:36 AM
Share

‘एक वर्ष सोनं कोणीच खरेदी करु नका…’, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला केलं आहे. पंतप्रधान म्हणाले, ‘घरामध्ये लग्न असो किंवा दुसरा कोणता कार्यक्रम पुढच्या एक वर्षापर्यंत सोनं कोणीच खरेदी करु नाही…’ असं मोदी म्हणाले आहे. सांगायचं झालं तर, अमेरिका-इराण युद्धामुळे जगात तेल संकटाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दरम्यान वाढता तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काही आवाहनं केली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, भारताकडे किती सोनं आहे आणि जगात सर्वात मोठा सोन्याचा साठा कोणत्या देशाकडे आहे? याबद्दल जाणून घ्या…

सर्वात सोनं ज्या देशाकडे आहे, त्या देशाचं नाव अमेरिका आहे… या यादीत अमेरिका अव्वल स्थानी आहे. सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे आणि हे स्थान देशानं बऱ्याच काळापासून टिकवून ठेवलं आहे. आकडेवारीनुसार, अमेरिकेचा US Gold Reserve जवळपास 8,133.50 टन आहे.

दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी हा देश आहे. सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेल्या देशांच्या यादीत जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे… या देशाकडे Germany Gold Reserve जवळपास 3,351.5 टन आहे… सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ देखील होत आहे.

तिसऱ्या क्रमांकावर इटली हा देश आहे… Highest Gold Reserve असलेल्या टॉप 10 देशांच्या यादीच इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे… आकड्यांवर नजर टाकल्यास कळेल की, Italy Gold Reserve जवळपाल 2,452 टन आहे.

चौथ्या क्रमांकावर फ्रान्स हा देश आहे. फ्रान्समध्ये देखील सोन्याचा साठा फार मोठ्या प्रमाणावर आहे. France Gold Reserve च्या आकड्यांनुसार, या देशाकडे जवळपास 2,437 टन सोनं आहे.

सर्वात जास्त सोनं असलेल्या देशांच्या यादीमध्ये रशिया या देशाचं नाव देखील टॉप 5 मध्ये आहे… रशिया देखील सोन्याची खरेदी करणारा मोठा देश आहे… या देशाचं Russia Gold Reserve लगभग 2,333 टन आहे.

सहाव्या क्रमांकावर चीन हा देश आहे. सोनं खरेदीमध्ये चीन टॉपमध्ये आहे याशिवाय, येथे एक सोन्याचा उत्पादकही आहे. पण सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत देश सहाव्या क्रमांकावर आहे. China Gold Reserve जवळपास 2,303.50 टन आहे.

तर सातव्या क्रमांकावर स्वित्झर्लंड देश आहे. स्वित्झर्लंड हा सोन्याचा एक प्रमुख उत्पादक देश असून अनेक प्रमुख देशांना सोन्याची निर्यात करतो. सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या देशांमध्ये त्याचा सातवा क्रमांक लागतो, जिथे 1,039.90 टन सोन्याचा साठा आहे. सांगायचं झालं तर, भारत स्वित्झर्लंडकडून सर्वाधिक सोन्याची आयात करतो, जी त्याच्या एकूण आयातीच्या अंदाजे 40 टक्के आहे.

आठव्या क्रमांकावर भारत देश आहे. पण यामध्ये दिवसागणिक मोठ्याने वाढ होत आहे. India’s Gold Reserve जवळपास 880.13 आहे. सांगायचं झालं तर, भारत जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या आयातदारांपैकी एक आहे. भारत दरवर्षी अंदाजे 750 टन सोन्याची आयात करतो.

पहिल्या 10 देशांमध्ये समावेश असला तरी, सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत जपान भारताच्या मागे आहे. जपान या देशाचा गोल्ड रिझर्व्ह अंदाजे 846 टन आहे.

10 देशांमध्ये सर्वात शेवटचा देश तुर्किये आहे. 612 टन सोन्याच्या साठ्यासह नेदरलँड्स या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. तुर्किये आणि पोलंड यांच्याकडेही नेदरलँड्सच्या जवळपास सोन्याचा साठा आहे.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!