AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM MODI यांचे अखंड 25 वर्षांचे नेतृत्व, केंद्रीय मंत्रिमंडळाने केला अभिनंदनाचा ठराव, १० ठळक वैशिष्ट्ये काय?

केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसेवेत २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला आहे. या ठरावात मोदी यांनी केलेल्या देशात केलेल्या दहा महत्वाच्या बदलांचा समावेश करण्यात आला आहे.

PM MODI यांचे अखंड 25 वर्षांचे नेतृत्व, केंद्रीय मंत्रिमंडळाने केला अभिनंदनाचा ठराव, १० ठळक वैशिष्ट्ये काय?
pm modi
| Updated on: Oct 06, 2026 | 11:03 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारप्रमुख म्हणून सलग २५ वर्षांचे नेतृत्व पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने आज अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. हा ठराव केवळ औपचारिक गौरव नसून “राष्ट्र प्रथम आणि नागरिक प्रथम” या तत्त्वांवर आधारित त्यांच्या असामान्य नेतृत्वप्रवासाचा गौरव करणारा आहे. गुजरातमधील सलग तीन प्रचंड जनादेश आणि लोकसभा निवडणुकांमधील सलग तीन विजय हे जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.

गुजरातपासून भारताच्या नेतृत्वापर्यंतचा प्रवास दर्शवणारी १० ठळक वैशिष्ट्ये

१. गुजरातपासून भारतापर्यंत – विकासदृष्टीचा विस्तार

गुजरातमध्ये यशस्वी ठरलेल्या अनेक उपक्रमांना पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावर नेले. नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकण्यासाठी सुरू झालेल्या SWAGAT उपक्रमाला २०१० मध्ये संयुक्त राष्ट्रांचा Public Service Award मिळाला. याच संकल्पनेतून नंतर PRAGATI कार्यक्रम विकसित झाला, ज्याद्वारे प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेऊन अडथळे दूर करण्याचे काम झाले. ज्योतिग्राम योजनेतील स्वतंत्र कृषी वीजवाहिन्यांची संकल्पनाही राष्ट्रीय धोरणाचा भाग बनली.

२. गरिबांविषयीची संवेदनशीलता – सन्मानपूर्ण जीवनाकडे वाटचाल

पंतप्रधान मोदी यांच्या बालपणीच्या अनुभवांमधून आणि देशभरातील प्रवासातून त्यांना गरिबीचे वास्तव जवळून पाहायला मिळाले. या अनुभवांचे प्रतिबिंब घरकुल, पाणी, बँकिंग आणि आरोग्यसेवा पुरवणाऱ्या विविध योजनांमध्ये दिसते. जवळपास ६० कोटी जनधन खाती, ४ कोटींहून अधिक घरे आणि २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर पडल्याचा उल्लेख करून ठरावात या प्रयत्नांचा गौरव करण्यात आला आहे.

३. सक्षमीकरणातून संधींचे दरवाजे खुले

लोकांना स्वतःचे भविष्य घडविण्यासाठी सक्षम बनविण्याचा पंतप्रधान मोदी यांचा निर्धार या ठरावात अधोरेखित करण्यात आला आहे. सुमारे ३.५ कोटी महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत, तर नारी शक्ती वंदन अधिनियमाने महिलांसाठी राजकीय प्रतिनिधित्वाचा मार्ग खुला केला. स्टार्टअप, कौशल्य विकास आणि शैक्षणिक सुधारणांमुळे युवकांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या. पीएम-किसान अंतर्गत ₹४ लाख कोटींपेक्षा अधिक निधी हस्तांतरित करण्यात आला असून पीएम-जनमन योजनेद्वारे विशेषतः दुर्बल आदिवासी समुदायांना सहाय्य देण्यात आले.

४. सुधारणांप्रती अढळ बांधिलकी

राजकीय जोखीम पत्करूनही आवश्यक सुधारणा राबविण्याची पंतप्रधान मोदी यांची तयारी ठरावात विशेषत्वाने नमूद करण्यात आली आहे. जीएसटी, कल्याणकारी योजनांच्या वितरणातील सुधारणा आणि वसाहतकालीन कायद्यांच्या जागी नवीन कायदे आणणे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वच्छता, डिजिटल पेमेंट्स आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या आवाहनांमुळे नागरिकही परिवर्तन प्रक्रियेत सहभागी झाले.

५. आत्मनिर्भर भारताची पायाभरणी

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक भांडवली खर्च ₹२ लाख कोटींवरून ₹१२ लाख कोटींहून अधिक झाला. राष्ट्रीय महामार्ग विस्तार, रेल्वे विद्युतीकरण, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात ₹२ लाख कोटींवरून ₹१३ लाख कोटींपेक्षा अधिक वाढ, संरक्षण उत्पादन आणि सेमीकंडक्टर उत्पादन यांचा उल्लेख करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधोरेखित करण्यात आली आहे.

६. नागरिकांच्या सेवेत तंत्रज्ञान

पंतप्रधान मोदी यांचा तंत्रज्ञानावरील विश्वास जनकल्याण आणि वैज्ञानिक प्रगती या दोन्ही क्षेत्रांत दिसून येतो. जनधन–आधार–मोबाईल (JAM) त्रिसूत्रीमुळे लाभांचे वितरण अधिक प्रभावी झाले, तर UPI ने डिजिटल व्यवहारांमध्ये क्रांती घडवली. भारतात विकसित झालेल्या कोविड लसी आणि चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी अवतरण हे आत्मनिर्भर आणि वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम भारताच्या दृष्टीचे प्रतीक असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. खासगी अंतराळ क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञानातील उपक्रमही याच दृष्टीचा भाग आहेत.

७. आव्हानात्मक काळातील स्थिर नेतृत्व

कोविड महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिशा दिली, देशांतर्गत लस विकासाला प्रोत्साहन दिले आणि व्यापक लसीकरण मोहीम राबवली. पश्चिम आशियातील संकटाच्या काळात ऊर्जा सुरक्षेसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे भारताला मोठ्या अडचणींचा सामना करण्यास मदत झाली. दीर्घकालीन क्षमताविकास आणि तात्काळ प्रतिसाद यांचा प्रभावी संगम त्यांच्या नेतृत्वात दिसून आला.

८. निर्णायक नेतृत्वातून सुरक्षितता आणि आत्मविश्वास

२०१६ मधील सर्जिकल स्ट्राईक, २०१९ मधील बालाकोट हवाई कारवाई आणि २०२५ मधील ऑपरेशन सिंदूर यांचा उल्लेख राष्ट्रीय सुरक्षेबाबत निश्चित केलेल्या मर्यादा आणि धोरणात्मक भूमिकेच्या उदाहरणांप्रमाणे करण्यात आला आहे. कलम ३७० हटविणे, वन रँक वन पेन्शन, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) पदाची निर्मिती, माओवादी हिंसाचाराविरुद्धची कारवाई आणि ईशान्य भारतातील शांतता प्रयत्न यांचाही ठरावात उल्लेख आहे.

९. जागतिक मंचावर भारताचा वाढता प्रभाव

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची जागतिक प्रतिष्ठा वाढल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. G20 आणि BRICS मध्ये सहमती निर्माण करणे, ग्लोबल साऊथ च्या मुद्द्यांना आवाज देणे आणि आफ्रिकन युनियनला G20 मध्ये स्थान मिळवून देणे ही त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणून अधोरेखित करण्यात आली आहे. व्हॅक्सीन मैत्री उपक्रमाद्वारे भारताने जगाला मदतीचा हात दिला. ३६ देशांकडून मिळालेल्या सन्मानांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

१०. वारसा आणि जबाबदारीतून प्रेरित प्रगती

पंतप्रधान मोदी यांची विकासदृष्टी आर्थिक प्रगती, सांस्कृतिक आत्मविश्वास आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समन्वय साधणारी असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. गुजरातमधील हवामान बदल विभागापासून सुरू झालेली वाटचाल अक्षय ऊर्जा विस्तार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यापर्यंत पोहोचली. योग, भरडधान्ये (मिलेट्स), काशी विश्वनाथ धाम आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा यांमुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाशी असलेले नाते अधिक दृढ झाले.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?