PM Narendra Modi: मोठी बातमी!आज रात्री 8.30 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश काय? महिला आरक्षण बिलावर बोलणार?
PM Modi Address Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री 8.30 वाजता देशाशी संवाद साधतील. यापूर्वी त्यांनी 8 वाजता देशाला काही महत्त्वाच्या विषयावर संबोधित केले होते. नोटबंदी असो वा कोरोना काळात टाळेबंदी असो मोदी यांनी नागरिकांशी महत्त्वाच्या प्रसंगी थेट संवाद साधला आहे. आज ते कोणत्या विषयावर बोलणार?

PM Modi Address Today 8:30 PM Tonight: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री 8.30 वाजता देशाला संबोधित करतील. यापूर्वी त्यांनी महत्त्वाच्या प्रसंगात 8 वाजता देशातील जनतेशी थेट संवाद साधला आहे. नोटबंदीची घोषणा असो वा कोरोना काळातील टाळेबंदी त्यांनी जनतेला याविषयीची माहिती दिली आहे. आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय घोषणा करणार, कोणत्या विषयावर बोलणार याची चर्चा रंगली आहे. काल महिला आरक्षण बिल लोकसभेत नामंजूर झाले. त्यावर मोदी बोलतील का? गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच विरोधकांची अभूतपूर्व एकजूट दिसली. मोदींच्या शासनकाळात पहिल्यांदाच एखादे बिल विरोधी पक्षांनी पाडले आहे. त्यामुळे याविषयीवर ते बोलणार की, अजून काही तरी मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संसदेत विधेयक नामंजूर
केंद्र सरकारने संसदेत महिला आरक्षणाबाबत 131 वी घटना दुरुस्ती विधेयक मांडले. त्यावर जोरदार चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधकांनी त्यावर मतं मांडलं. विरोधकांनी सरकारला हे बिल मंजूर होणार नाही हे माहिती असतानाही त्यांनी ते रेटल्याचा आरोप केला. हे विधयेक मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश मतांची गरज होती. विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 230 मतं पडली. घटनादुरुस्तीसह नारी शक्ती वंदन बिल काही मंजूर होऊ शकले नाही.
महिला आरक्षण वर्ष 2029 पासून लागू करण्यासाठी आणि मतदार संघ वाढवण्यासाठी घटना दुरुस्तीसाठी हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. त्यावर शनिवारी दोन्ही बाजूने तीव्र मतभेद समोर आले. काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांनी मोर्चा सांभाळला. तर सत्ताधारी आमदार, खासदारांनी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे.
सरकारचे षडयंत्र हाणून पाडले
काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी महिला आरक्षण बिलाआडून सरकार मतदार संघ पुनर्रचना विधेयक लादू पाहत होते. त्यामुळे भाजपचे सरकार पुढे कित्येक वर्ष हटले नसते यासाठी तजवीज करण्यात येणार होती, हे सरकारचे षडयंत्र होते. ते विरोधकांच्या एकजुटीमुळे काल हाणून पाडण्यात आले, असा दावा केला. त्यांनी सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. जे विधयेक 2023 मध्ये मंजूर होते, तेच पुन्हा दुरुस्ती आणण्यावर विरोधकांनी आक्षेप नोंदवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किरेन रिजीजू यांचा हल्लाबोल
केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर तीव्र हल्लाबोल केला. आता विरोधकांना महिलांच्या संतापाला सामोरे जावे लागेल असे ते म्हणाले. विरोधकांनी विश्वासहर्यता गमावली आहे. त्यांना महिलांच्या टीकेला सामोरे जावे लागेल असे मंत्री किरेन रिजीजू म्हणाले. तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मोठी संधी आहे, विरोधकांनी पाठिंबा द्यावा नाहीतर विरोधकांना फटका बसेल असा इशारा दिला होता. त्यावरूनही विरोधकांमध्ये नाराजी असल्याचे समजते.