Vice Presidential Election 2025 : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सुरू, पंतप्रधान मोदींकडून सर्वप्रथम मतदान
सकाळी 10 च्या सुमारास संसद भवन परिसरात दाखल झालेल्या पंतप्रधान मोदी यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सुरू होताच पहिलं मतदान केलं. त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या खासदारांनी मतदान केलं. मतदानानंतर मोदी संसदेतून रवाना झाले.

जगदीप धनखड यांनी तडकाफ़की राजीनामा दिल्यानंतर अखेर आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडमूक पार पडत आहे. सकाळी 10 वाजता मतदानाला सुरूवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान चालेल. त्यानंतर मतमोजणी होऊ आज संध्याकाळीच देशाला नवे उपराष्ट्रपती मिळतील. सीपी राधाकृष्णन वि बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत असून आज कोणाचा विजय होतो, देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान पंत्परधान नरेंद्र मोदींनी या निवडणुकीसाठी आज सर्वप्रथम मतदान केले.
सकाळी 10 च्या सुमारास संसद भवन परिसरात दाखल झालेल्या पंतप्रधान मोदी यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सुरू होताच पहिलं मतदान केलं. त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या खासदारांनी मतदान केलं. मतदानानंतर मोदी संसदेतून रवाना झाले. आज ते पूरग्रस्त पंजाबच्या दौऱ्यावर जाणार आहेत. संसद भवन संकुलातील वसुधा येथील कक्ष क्रमांक एफ-101 मध्ये आज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होत आहे.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi cast his vote for the Vice Presidential election at the Parliament House this morning.
(Video: DD News) pic.twitter.com/3cxQJNJSrm
— ANI (@ANI) September 9, 2025
Voted in the 2025 Vice President election. pic.twitter.com/soCoJJmHSI
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2025
सीपी राधाकृष्णन वि सुदर्शन रेड्डी
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जुलैमध्ये अचानक राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव आपण पद सोडत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यानंतर उपराष्ट्रपतींची खुर्ची रिकामीच होती. अखेर 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे आज 10 वाजता निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं. एनडीएतर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बी. सुदर्शन रेड्डी हे इंडिया अलायन्सतर्फे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील उमेदवार आहेत. BJD, BRS और SAD ने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर बीआरएसकडे 4, बीजेडीकडे 7 आणि अकाली दलाचा 1 खासदार आहे. म्हणजे एकूण 12 खासदार आजच्या निवडणुकीत मतदान करणार नाहीत. त्यामुळे एकूण 769 मतं पडण्याची शक्यता आहे. बहुमताचा आकडा 385 मतांचा असून ज्या उमेदवाराला निम्म्यापेक्षा अधिक, सर्वाधक मतं मिळतील, त्याच्या नावाची विजेता म्हणून घोषणा केली जाईल.
उपराष्ट्रपतींची निवडणूक ही राष्ट्रपती निवडणुकीपेक्षा थोडी वेगळी असते. राष्ट्रपती निवडणुकीत खासदारांसोबतच राज्य विधानसभांचे सदस्यही मतदान करतात, तर उपराष्ट्रपती निवडणुकीत फक्त खासदारच मतदान करतात. यावेळी एकूण 781 खासदार मतदान करण्यास पात्र आहेत. यामध्ये लोकसभेचे 542 सदस्य (सभापती वगळता) आणि राज्यसभेचे 239 सदस्य आहेत. आता आज कोणाल सर्वाधिक मतं मिळतात, सीपी राधाकृष्णन की सुदर्शन रेड्डी यांच्यापैकी कोण नवे उपराष्ट्रपती बनतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संध्याकाळी 5 वाजत मतदान संपेल. त्यानंतर मतमोजणी होऊन 6च्या सुमारास निकाला लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
