AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी यांचा 2024साठी सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक!! राम मंदिर निर्मितीनंतर रामसेतूच्या जागेवरही दावा ठोकणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथपुरम येथून निवडणूक लढवली तर उत्तरेत अयोध्येतील राम मंदिर निर्माणानंतर दक्षिणेत रामसेतूपर्यंत मोदींचा दबदबा वाढण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी यांचा 2024साठी सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक!! राम मंदिर निर्मितीनंतर रामसेतूच्या जागेवरही दावा ठोकणार?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 23, 2022 | 9:15 AM
Share

नवी दिल्लीः लोकसभा (Loksabha) असो किंवा विधानसभा.. भाजपचं (BJP) प्लॅनिंगच एवढं जबरदस्त असतं की भल्या भल्यांना धक्के बसतात. राजकीय वर्तुळात अनेकांना हा अनुभव आला असेल. खुद्द देखील मोदींनीदेखील (PM Narendra Modi) भाजपाच्या मायक्रोप्लॅनिंगबद्दल एकदा भाषणात सांगितलं होतं. आगामी 2024 च्या निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात मोठ्या मास्टरस्ट्रोकची माहिती समोर आली आहे. तमिळनाडूतील रामनाथपुरम लोकसभा मतदार संघातून मोदी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

रामेश्वरम हे पवित्र ज्योतिर्लिंग असलेल्या रामनाथपुरम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत, असे वृत्त नवभारत टाइम्सने दिले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडोदरा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून निवडणूक लढवली होती.

भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागात प्रभाव गाजवण्यात यशस्वी झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिणेच्या स्वारीसाठी सज्ज झाल्याचं म्हटलं जातंय.

मोदी काय म्हणाले होते?

2019 च्या लोकसभा निवडणुकांनंतर एका पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, आमच्या योजना साध्या नसतात. शेवटच्या क्षणी निर्णय बदलतो, असं दिसतं. पण ते तसं नसतं. आम्ही खूप डिटेल प्लॅनिंग करतो. गोष्टी आधीच उघड करत नाहीत. तुम्हाला त्या हळू हळू कळतात…. या वक्तव्याचे अर्थ आता कळू लागले आहेत.

उत्तर भारतात नितीश कुमार, सुखबीर बादल आणि इतर लहान पक्षांमुळे जे नुकसान झालंय, ते दक्षिण भारतातून भरून काढण्याचा भाजपाचा विचार आहे.

रामनाथपुरम हा तमिळनाडूतल्या 38 जिल्ह्यांपैकी एक आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं जन्मस्थळ.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, देवस्थळ आणि द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक रामेश्वरम याच जिल्ह्यात आहे. पौराणिक उल्लेखांनुसार, येथूनच रामसेतूची सुरुवात झाली होती. याच मार्गाने रामाने लंकेवर स्वारी केली होती.

काही दिवसांपूर्वी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगमम् हा कार्यक्रमही आयोजित केला होता. रामसेतूच्या मार्गाने मोदी दिल्लीतील महायुद्ध जिंकण्यासाठी निघाले आहेत, असा संदेशही भाजपातर्फे दिला जाऊ शकतो.

वृत्तातील माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथपुरम येथून निवडणूक लढवली तर उत्तरेत अयोध्येतील राम मंदिर निर्माणानंतर दक्षिणेत रामसेतूपर्यंत मोदींचा दबदबा वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ