अहमद भाईंनी आयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली; त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गांधी घराण्याचे विश्वासू, खासदार अहमद पटेल यांचं निधन झालंय.

अहमद भाईंनी आयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली; त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 7:51 AM

नवी दिल्ली :  काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गांधी घराण्याचे विश्वासू, खासदार अहमद पटेल  (Ahmed patel) यांचं निधन झालंय. आज पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra Modi) यांनी ट्विटरद्वारे अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सार्वजनिक आयुष्यात त्यांनी अनेक वर्ष समाजाची सेवा केली. त्यांच्या तल्लख बुद्धीमत्तेसाठी तसंच पक्षाला बळकटी देण्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांना नेहमीच स्मरणात ठेवेल, अशा शब्दात मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Pm Narendra Modi Tribute Amhed Patel)

“अहमद पटेल यांच्या निधनाने मी दु:खी झालोय. अहमद पटेल यांनी त्यांच्या सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्ष समाजाची सेवा केली. काँग्रेसमधील त्यांची भूमिका, पक्षासाठी त्यांचं योगदान काँग्रेस नेहमी स्मरणात ठेवेल. त्यांचा मुलगा फैजलशी बोलून भावना व्यक्त केला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, असं मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त त्यांचे सुपूत्र फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरु दिलं. साधारण महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (corona report positive) आला होता. त्यानंतर त्यांची तब्येत जास्तच खालावली होती. जास्त त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. (Senior Congress leader Ahmed Patel passes away)

फैजल पटेल यांनी दु:खद ट्विट करताना म्हटलंय “आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 मे रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. फैजल पटेल यांनी पुढे लिहिले आहे की, “मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनसाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी”.

कोण आहेत अहमद पटेल?

अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणमून ओळखले जायचे. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना होती. तसंच जेव्हा पक्षहिताचा प्रश्न यायचा, तेव्हा सोनिया गांधी अहमद पटेल यांचा सल्ला अंतिम मानायच्या. एकूणच गांधी कुटुंब आणि काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांना मानाचं स्थान होतं.

त्यांच्या जाण्याने काँग्रेसची मोठी हानी झालीये. देशभरात काँग्रेसची पिछेहाट होताना त्यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय. ट्विटर, फेसबुकद्वारे नेते, कार्यकर्ते पटेल यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांचे निधन, मुलगा फैजल पटेल यांची ट्विटरद्वारे माहिती

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.