PM Modi & Donald Trump Talk : ऑपरेशन सिंदूर सुरु राहील तसच अजून…पीएम मोदींनी ट्रम्प यांना काही गोष्टी केल्या स्पष्ट

PM Modi & Donald Trump Talk : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात G7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार होती. पण इस्रायल-इराण युद्धामुळे ट्रम्प बैठक अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले. त्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये 35 मिनिटे चर्चा झाली. यावेळी मोदी यांनी ट्रम्प यांच्यासमोर काही मुद्दे स्पष्टपणे मांडले. भारताची भूमिका सांगितली.

PM Modi & Donald Trump Talk : ऑपरेशन सिंदूर सुरु राहील तसच अजून...पीएम मोदींनी ट्रम्प यांना काही गोष्टी केल्या स्पष्ट
नरेंद्र मोदी- डोनाल्ड ट्रंप यांच्यात फोनवरून चर्चा
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 18, 2025 | 10:07 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा झाली. ऑपरेशन सिंदूरबद्दल पीएम मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये बोलणं झालं. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चर्चेची पुष्टि केली. मोदी आणि ट्रम्प यांच्यात जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेदरम्यान ट्रम्प कॅनडावरुन पीएम मोदींना अमेरिकेला बोलवत होते. पण पुढच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे पीएम मोदींनी अमेरिकेला जायला नकार दिला. ट्रम्प यांनी, तुम्ही अमेरिकेला येऊ शकता का? असं मोदींना विचारलं. पण पीएम मोदींनी कॅनडावरुन अमेरिकेला जायला असमर्थता व्यक्त केली. याचवेळी पीएम मोदींनी ट्रम्प यांना भारताला मध्यस्थता मान्य नसल्याच सांगितलं. ऑपेरशन सिंदूर सुरु आहे, असं पीएम मोदी ट्रम्प यांना स्पष्टपणे बोलले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात G7 शिखर सम्मलेनादरम्यान बैठक होणार होती. पण राष्ट्रपती ट्रम्प यांना घाईगडबडीत अमेरिकेला निघावं लागलं. त्यामुळे पीएम मोदी आणि ट्रम्प यांची बैठक झाली नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी पुढाकार घेत पीएम मोदींसोबत फोनवरुन चर्चा केली. या चर्चेच्यावेळी दोघांमध्ये ऑपरेशन सिंदूर ते इराण-इस्रायल युद्धापर्यंतच्या विषयांवर चर्चा झाली. ट्रम्प यांनी पीएम मोदींना कॅनडावरुन अमेरिकेला बोलावलं. पण मोदींनी अमेरिकेला जायला असमर्थता व्यक्त केली. त्याचवेळी मोदींनी ट्रम्प यांना भारतात येण्याच निमंत्रण दिलं.

‘भारताने मध्यस्थता कधी मान्य केली नाही, ना करणार’

पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना स्पष्टपणे बोलले की, या सगळ्या घटनाक्रमादरम्यान कुठल्याही स्तरावर भारत-अमेरिकेमध्ये ट्रेड डील, अमेरिकेमार्फत भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थता सारख्या विषयांवर चर्चा झाली नाही. सैन्य कारवाई थांबवण्यासंबंधी थेट भारत-पाकिस्तानमध्ये बोलण झालं. दोन्ही सैन्यांमध्ये उपलब्ध चॅनलच्या माध्यमातून बोलण झालेलं. पाकिस्तानच्या आग्रहावरुन सीजफायरचा निर्णय झाला. पंतप्रधान मोदींनी जोर देऊन सांगितलं की, भारताने मध्यस्थता कधी मान्य केली नाही, ना करणार. या विषयावर भारतात पूर्णपणे राजकीय एकमत आहे.

युद्ध म्हणूनच त्याकडे पाहू

पंतप्रधान मोदींनी जे सांगितलं, ते ट्रम्प यांनी समजून घेतलं व दहशतवादाविरुद्ध भारताच्या लढ्याच समर्थन केलं. पंतप्रधान मोदींनी हे सुद्धा सांगितलं की, भारत आता दहशतवादाला प्रॉक्सी वॉर समजणार नाही. युद्ध म्हणूनच त्याकडे पाहिलं आणि भारताच ऑपरेशन सिंदूर सुद्धा सुरु राहिलं.

राष्ट्रपती ट्रम्प यांनी निमंत्रण स्वीकारलं

QUAD च्या पुढच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती ट्रम्प यांना भारतात येण्याच निमंत्रण दिलं. राष्ट्रपती ट्रम्प यांनी निमंत्रण स्वीकारलं व भारतात येण्यास उत्सुक्त असल्याच सांगितलं.