AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : पंतप्रधान मोदींची 300 वर्षे जुन्या थंथनिया कालीबारी मंदिरात विशेष पूजा

PM Modi : पश्चिम बंगाल निवडणुकीसाठीच्या आपल्या रोडशोपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील ऐतिहासिक 'थंथनिया कालीबारी' मंदिराला भेट दिली. 300 वर्षे जुन्या असलेल्या या मंदिराला सखोल सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.

Narendra Modi : पंतप्रधान मोदींची 300 वर्षे जुन्या थंथनिया कालीबारी मंदिरात विशेष पूजा
PM Modi in TempleImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 26, 2026 | 8:53 PM
Share

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला वेग आला आहे. आज उत्तर कोलकाता येथे भव्य रोड शो सुरू करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील अतिप्राचीन थंथनिया कालीबारी मंदिराला भेट दिली. काली मातेसमोर दर्शन घेऊन आशीर्वाद घेत मोदींनी बंगालच्या संस्कृतीशी असलेले आपले नाते पुन्हा अधोरेखित केले. या मंदिराचे महत्त्व काय आहे आणि रामकृष्ण परमहंस यांचा या मंदिराशी काय संबंध आहे, हे सविस्तर जाणून घेऊयात.

शहरापेक्षाही जुना इतिहास

कोलकाता शहर अधिकृतपणे विकसित होण्यापूर्वीच हे मंदिर अस्तित्वात आले होते. 1703 मध्ये स्थापन झालेल्या या मंदिराला 300 वर्षांहून अधिक इतिहास आहे. येथे देवीला मा सिद्धेश्वरी म्हणून भक्त अत्यंत श्रद्धेने पूजतात. भक्तांच्या मते ही देवी जागृत आहे.

रामकृष्ण परमहंस यांचे श्रद्धास्थान

आध्यात्मिक गुरु रामकृष्ण परमहंस यांचा या मंदिराशी अतूट संबंध होता. इतिहासानुसार ते वारंवार या मंदिरात येत असत आणि मा सिद्धेश्वरीच्या भक्तीत तल्लीन होत असत. त्यांनी येथे उच्चारलेले अमृतवचन आजही मंदिराच्या भिंतींवर पाहायला मिळतात. शंकरेर हृदय माझे, काली बिराजे याचा अर्थ, भगवान शंकरांच्या हृदयात काली माता विराजमान आहेत.

मांसाहारी नैवेद्य

देशातील अत्यंत कमी काली मंदिरांमध्ये मांसाहारी प्रसाद अर्पण करण्याची परंपरा आहे आणि थंथनिया कालीबारी त्यापैकी एक आहे. या परंपरेमागे एक रंजक कथा आहे. केशबचंद्र सेन यांच्या आरोग्यलाभासाठी रामकृष्ण परमहंस यांनी स्वतः देवीसमोर ‘दाब-चिंग्री’ (नारळात शिजवलेला कोळंबी पदार्थ) अर्पण केला होता. तेव्हापासून आजपर्यंत आरोग्य समस्यांपासून मुक्तीसाठी भक्त येथे मांसाहारी प्रसाद अर्पण करतात. मंदिरातील पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रामकृष्ण परमहंस आजारी पडल्यावर त्यांच्या अनुयायांनीही अशीच मनोकामना पूर्ण केली होती.

मोदींच्या दौऱ्याचे महत्त्व

रोड शोपूर्वी नरेंद्र मोदी यांनी येथे पूजा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. बंगाली जनतेच्या श्रद्धास्थान असलेल्या काली मातेचे आशीर्वाद घेऊन त्यांनी स्थानिक जनतेशी भावनिक नातं मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे विश्लेषकांचे मत आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातुआ मंदिरालाही भेट दिली.

बोरो मा बिनापाणी ठाकूर यांच्याशी त्यांचे विशेष सन्मानाचे संबंध असल्याचे म्हटले जाते. 2019 मध्ये त्यांच्या आजारपणात मोदींनी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या निधनानंतर सरकारी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हरिचंद ठाकूर आणि गुरूचंद ठाकूर यांनी दिलेल्या मानवता आणि समानतेच्या संदेशाचा उल्लेखही पंतप्रधान आपल्या भाषणांमध्ये वारंवार करत असतात.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल