AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या कर्करोगाने ग्रस्त, बेल्जियममध्ये उपचार सुरु

या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास चोक्सीची जप्त केलेल्या सर्व संपत्तीवर टांच आणण्याची प्रक्रिया तपास यंत्रणेनं सुरू केली आहे. यामुळे त्याची आर्थिक नाकाबंदी करणं शक्य होणार आहे.

PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या कर्करोगाने ग्रस्त, बेल्जियममध्ये उपचार सुरु
Mehul Choksi
| Updated on: Feb 11, 2025 | 10:32 PM
Share

Mehul Choksi Cancer : पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील फरार आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सी हा कर्करोगानं ग्रस्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मेहुल चोक्सीवर बेल्जियममध्ये उपचार सुरु आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात चोक्सीच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे.

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी फरार

मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 400 कोटींना गंडा घालता होता. त्यानंतर मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी हे आपल्या कुटुंबासहसह देशातून पसार झाले होते. यानंतर तपास यंत्रणेनं 2018 च्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल होतं. या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास चोक्सीची जप्त केलेल्या सर्व संपत्तीवर टांच आणण्याची प्रक्रिया तपास यंत्रणेनं सुरू केली आहे. यामुळे त्याची आर्थिक नाकाबंदी करणं शक्य होणार आहे.

आज कोर्टात काय घडलं?

मेहुल चोक्सी प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देऊन तूर्तास भारतात परतण्यास असमर्थ असल्याचं आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, मेहुल चोक्सी हे आजारी असून ते आरोग्यविषयी समस्यांबद्दल वस्तुस्थिती नोंदवण्यासाठी अर्ज दाखल करु इच्छितात. मेहुल चोक्सी हे सध्या उपचारासाठी बेल्जियममध्ये आहे. मेहुल चोक्सीला कर्करोग झाल्याची भीती आहे. यामुळे मेहुल चोकसीने भारत परत येण्यास असमर्थ असल्याचं म्हटलं आहे.

मेहुल चोक्सीचा पासपोर्ट रद्द

दरम्यान, मेहुल चोक्सीचा पासपोर्ट भारताकडून रद्द करण्यात आला आहे. पीएमएलए न्यायालयात चोक्सीच्या पासपोर्टच्या निलंबनासंदर्भातील कागदपत्रे आणि त्याच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) प्रकरणाच्या तपास फायली मागवण्याचे निर्देशही यापूर्वी देण्यात आले होते. तसेच मेहुल चोक्सीशी संबंधित 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी पीएमएलए कोर्टानं दिली होती. त्यानुसार सध्या कारवाई केली जात आहे.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.