पोप फ्रान्सिस यांना जडला होता ब्रोन्कोस्पाज्म आजार? नेमका कशामुळे होतो?
पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं आहे. ते बऱ्याच दिवसांपासून ब्रोन्कोस्पाज्म (Bronchospasm) या आजाराने त्रस्त होते.

Pope Francis death : पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं आहे. ते बऱ्याच दिवसांपासून ब्रोन्कोस्पाज्म (Bronchospasm) या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर जगभरातून दु:ख व्यक्त केलं जातंय. व्हॅटिकन सिटीमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी ईस्टरच्या निमित्ताने ते लोकांसमोर आले होते. त्यानंतर आता त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर आता त्यांना जडलेला बोन्कोस्पाज्म हा आजार नेमका काय आहे? असे विचारले जात आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून होते आजारी
पोप फ्रान्सिस हे गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांना ब्रोन्कोस्पाज्म नावाचा आजार होता. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. ब्रोन्कोस्पाज्म हा श्वसनाशी संबंधित आजार आहे. याच कारणामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण यायची.
ब्रोन्कोस्पाज्म हा आजार फुफ्फुसाशी संबंधित आहे. फुफ्फुसातील ब्रोन्काई या भागातील वायुमार्ग छोटा होतो. त्यामुळे शरीराला मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.
हा आजार नेमका का होता?
हा आजार नेमका का होतो? याचे नेमके कारण समोर आलेले नाही. अजूनही यावर अभ्यास चालू आहे. अॅलर्जी आणि फुफ्फुसाशी संबंधित आजार असणाऱ्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. लहान मुलं आणि 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना हा आजार होऊ शकतो. क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर (सीओपीडी), व्हायरल, बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन, धुम्रपान, वायू प्रदूषण यामुळेदेखील बोन्कोस्पाज्म हा आजार होऊ शकतो.
ब्रोन्कोस्पाज्म आजाराची लक्षणं कोणती?
ब्रोन्कोस्पाज्म आजार झालेल्यांना श्वास घेण्यास अडचणी येतात. छाती जड होते. छातीत घरघर आवाज येतो. खोकला यायला लागतो. अंगात थकवा जाणवतो. चक्कर यायला लागतात. अशी काही या आजाराची लक्षणं आहेत.
ब्रोन्कोस्पाज्म आजारावर उपचार कसा करावा?
ब्रोन्कोस्पाज्म या आजारावरील उपचारादरम्यान वेगवेगळी औषधं दिली जातात. या आजाराने गंभीर स्वरुप घेतलेले असेल तर डॉक्टर तुम्हाला स्टेरॉईड्स देतात. या आजारापासून वाचायचे असेल तर शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका. शरीरा हायड्रेटेड ठेवायला हवे. धुम्रपान करू नये. व्यायाम करण्याआधी वॉर्मअप करावे. श्वाच्छोसवासाचे व्यायाम करावेत. एखाद्या गोष्टीपासून अॅलर्जी असेल तर त्यापासून दूर राहा.
