AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींनी स्वीकारला शिक्षणमंत्रिपदाचा पदभार, कसा आहे राजकीय प्रवास?

pralhad joshi : प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. त्यांना शिक्षण खात्याचा कार्यभार आव्हानात्मक असणार असल्याचे बोललं जात आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींनी स्वीकारला शिक्षणमंत्रिपदाचा पदभार, कसा आहे राजकीय प्रवास?
| Updated on: Jul 26, 2026 | 1:09 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जमुळे कॉक्रोच जनता पार्टीने मोदी सरकारला मोठा धक्का दिला. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे धर्मेंद्र प्रधान हे शिक्षणमंत्रिपदावरून पायउतार झाले. त्यांच्याजागी प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्रिपदाचा कारभार सोपवला. प्रल्हाद जोशी यांच्याकडे काल केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. तर राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा कारभार सोपवण्यास मंजुरी दिली. त्यानंतर आज प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.

प्रल्हाद जोशी हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. ते कर्नाटकच्या धारवाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्याकडे आधीच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रि‍पदाचा कारभार आहे. त्याचबरोबर ते इंटरनॅशनल सोलन अलायन्सचेही अध्यक्ष आहेत. आता त्यांनी नव्याने केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.

कसा आहे राजकीय प्रवास?

प्रल्हाद जोशी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1962 रोजी कर्नाटकाच्या विजयपुरा जिल्ह्यात झाला. त्यांनी आर्ट्स विषयात पदवी पूर्ण केली आहे. ते फार कमी वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. त्यानंतर भाजपमध्ये सक्रिय झाले. ते तीन दशकांपासून भारतीय राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्याकडे भाजपचा अनुभवी चेहरा म्हणून पाहिलं जातं.

प्रल्हाद जोशींना नवी जबाबदारी

प्रल्हाद जोशी यांना शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नीट पेपरफुटीनंतर त्यांना ही जबाबदारी मिळाली आहे. आता त्यांच्याकडे खात्याचा कारभार अधिक पारदर्शक करण्यासाठी काम करावे लागणार आहे. तसेच खात्यात अनेक सुधारणा कराव्या लागतील. आताच्या परिस्थिती शिक्षणमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणे आव्हानात्मक असणार आहे.

प्रधान यांनी राजीनामा का दिला?

नीट पेपरफुटी आणि शिक्षण खात्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सीजेपी आंदोलक महिनाभरापासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. सीजेपीच्या आक्रमक आंदोलनापुढे मोदी सरकार झुकलं. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा उचलू नये, असेही त्यांनी राजीनामा देताना पत्रात म्हटलं.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार