हळद, फुलं, पाणी आणि फुल्टू डान्स मस्ती; स्टार गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा लग्नाचा व्हिडीओ पाहिला काय?

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याची गर्लफ्रेंड रचनासोबत त्याने विवाह केला आहे. या विवाहाचा एक व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दोघेही फुल्टू धम्माल करताना दिसत आहेत.

हळद, फुलं, पाणी आणि फुल्टू डान्स मस्ती; स्टार गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा लग्नाचा व्हिडीओ पाहिला काय?
Prasidh Krishna Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 6:26 AM

नवी दिल्ली : एकीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियासमोर धावांचा डोंगर असतानाच टीम इंडियाचा स्टार गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने त्याच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून धम्माल उडवून दिली आहे. या व्हिडीओत तो पत्नी रचनासोबत फुल्टू धम्माल मस्ती करताना दिसत आहे. दोघेही जोरदार डान्स करताना दिसत असून त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रसिद्ध कृष्णा आणि रचनाचा 8 जून रोजी विवाह पार पडला. लग्नाच्या बरोबर तीन दिवसानंतर प्रसिद्ध कृष्णाने इन्स्टाग्रामवर लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दोघेही लग्नाचे रितीरिवाज पार पाडताना दिसत आहे. अंगाला हळद लावताना, अंगावर पाणी उडवताना, फुलांची उधळण करताना दिसत आहेत. कधी प्रसिद्ध कृष्णाला उचलून घेताना दिसतोय तर कधी रचना त्याला उचलून घेताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prasidh Krishna (@skiddyy)

दोघेही आपल्याच धुंदीत फुल्टू डान्स करताना दिसत आहे. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळीही ठेका धरताना दिसत आहेत. अवघ्या काही मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये धम्माल मस्ती दिसून येत आहे. या व्हिडीओत एका पार्टीत दोघेही मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटतानाही दिसत आहेत.

फॅन्सने केले फोटो शेअर

6 जून रोजी दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर 8 जून रोजी दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. त्यांच्या फोटोंना फॅन्सनी प्रचंड लाईक्स केले होते. काही फॅन्सनी तर त्यांचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरलही केले होते. या दोघांच्याही लग्नाला टीम इंडियातील अनेक खेळाडू हजर राहिले होते.

क्रिकेटपटू वऱ्हाडी

जसप्रीत बुमराह, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, कृष्णण्पा गौतमसहीत अनेक क्रिकेटपटू वऱ्हाडी म्हणून आले होते. दुखापतग्रस्त झाल्याने तो टीम बाहेर आहे. त्याला पाठीत दुखत असल्याने तो संघाबाहेर आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्येही फारसा दिसला नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला त्याची प्रचंड कमतरता जाणवली होती.

'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.