AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं हेलिकॉप्टर लँड होताच…थोडक्यात टळला मोठा अपघात, VIDEO

President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु काल म्हणजे 21 ऑक्टोंबर रोजी चार दिवसाच्या केरळ दौऱ्यावर तिरुवनंतपुरम येथे पोहोचल्या. राष्ट्रपती आज शबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिरात दर्शन घेतील आणि आरतीसाठी पत्तनामथिट्टा येथे जातील.

President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं हेलिकॉप्टर लँड होताच...थोडक्यात टळला मोठा अपघात, VIDEO
president droupdi murmu kerala visit
| Updated on: Oct 22, 2025 | 11:58 AM
Share

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केरळ दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांच्यासोबत एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पत्तनामथिट्टाच्या प्रमदम स्टेडियमच्या हॅलिपॅडवर राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरच लँडिंग होताच ते थोडं आत रुतलं. एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरच्या वजनाने हॅलिपॅडचा एक भाग जमिनीत रुतला. कुठली मोठी घटना झाली नाही. तिथे तैनात असलेले पोलीस आणि फायर डिपार्टमेंटच्या लोकांनी हेलिकॉप्टरला रुतलेल्या भागातून बाहेर काढलं. याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. यात रुतलेल्या हेलिकॉप्टपरला बाहेर काढण्यासाठी जोर लावला जात असल्याचं दिसतं.

ज्या हॅलिपॅडवर ही दुर्घटना घडली तो नवीन आहे. हेलिकॉप्टरने हॅलिपॅडवर लँडिंग केल्यानंतर खड्डे बनले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, शेवटच्या क्षणी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी स्टेडियमची निवड करण्यात आली होती. म्हणून मंगळवारी रात्री तिथे हॅलिपॅड बनवण्यात आलं. आधी राष्ट्रपतींच विमान पंबा जवळ निलक्कल येथे उतरवण्याची योजना बनवण्यात आलेली. पण खराब हवामानामुळे हॅलिकॉप्टर इथे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. काँक्रीट घट्ट बसलं नव्हतं. त्यामुळे हॅलिकॉप्टरने लँडिंग करताच हॅलिपॅडला वजनाचा भार सहन करता आला नाही. चाकांमुळे तिथे खड्डे बनले.

कसा आहे राष्ट्रपतींचा कार्यक्रम?

राष्ट्रपती मुर्मू 21 ऑक्टोंबर रोजी केरळ तिरुवनंतपूरम येथे पोहोचलेल्या. आज त्यांचा शबरीमाला मंदिरात जाण्याचा प्लान आहे. त्यानंतर गुरुवारी त्या तिरुवनंतपुरम येथील राजभवनात माजी राष्ट्रपती केआर नारायणन यांच्या प्रतिमेचं अनावरण करतील. वर्कला येथे शिवगिरी मठ येथे श्री नारायण गुरुंच्या महासमाधी शताब्दी समारोहाच उद्घाटन करतील. त्या शिवाय राष्ट्रपती कोट्टायम जिल्ह्यात पाला येथील सेंट थॉमस कॉलेजच्या 75 वर्ष पूर्ण होण्याच्या सांगता समारंभात सहभागी होतील. 24 ऑक्टोंबरला त्या एर्नाकुलम येथील सेंट टेरेसा कॉलेजच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. त्यानंतर त्यांचा केरळ दौरा समाप्त होईल.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....