AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर, नागपूरात दीक्षाभूमीला भेट देणार, पाहा संपूर्ण शेड्युल

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा दौरा करणार आहेत. येथे ते 33,700 कोटी रुपयांहून अधिक विकास योजनांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत.

पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर, नागपूरात दीक्षाभूमीला भेट देणार, पाहा संपूर्ण शेड्युल
| Updated on: Mar 28, 2025 | 5:43 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० मार्च रोजी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागपूरातील रेशिमबाग येथील ‘स्मृती मंदिर’ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस ) संस्थापकांना श्रद्धांजली अर्पण करतील आणि माधव नेत्रालय प्रिमियम सेंटरच्या विस्तारित भवनाचा कोनशिलेचे पूजन करतील. पंतप्रधान कार्यालयाने शुक्रवारी ही माहिती दिली आहे. आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बलीराम हेडगेवार आणि आरएसएसच्या द्वितीय सरसंघचालक एम.एस.गोळवलकर यांची स्मारकं डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आहेत.

दीक्षाभूमीला जाऊन डॉ.बाबासाहेबांना श्रल्दांजली अर्पण करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी छत्तीसगडचा दौरा देखील करतील. येथे ३३,७०० कोटी रुपयांहून अधिकच्या योजनांचे उद्घाटन आणि शिलान्यास करतील. पीएमओने म्हटलेय की हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान स्मृती मंदिरात दर्शन घेतील आणि आरएसएसच्या संस्थापकांना श्रद्धांजली वाहतील. ते दीक्षाभूमीला जातील आणि डॉ.बी.आर.आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहतील. येथे डॉ.बाबासाहेबांनी साल १९५६ साली आपल्या हजारो अनुयायांच्या सोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.

पीएम माधव नेत्रालय प्रिमीयम सेंटरचे भूमिपूजन

माधव नेत्रालय प्रिमियम सेंटरचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हे माधव नेत्रालय नेत्र संस्थान आणि संशोधन केंद्राचे एक नवे विस्तारित केंद्र होणार आहे. २०१४ मध्ये स्थापन झालेली ही संस्था नागपूर येथील एक प्रमुख सुपर-स्पेशालिटी नेत्र सेवा सुविधा आहे. पीएमओच्या मते, ही संस्था गुरुजी माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन करण्यात आली. नव्या प्रकल्पात २५० खाटांचे रुग्णालय, १४ बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि १४ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असतील, ज्याचा उद्देश लोकांना परवडणाऱ्या आणि जागतिक दर्जाच्या नेत्ररोग सेवा प्रदान करणे आहे.

मोहन भागवत यांचाही सहभाग

माधव नेत्रालय प्रिमियम सेंटरच्या कोनशिला कार्यक्रमात आरएसएस प्रमुख मोहन भागवत देखील सहभागी होणार आहेत. आएसएसच्या इतिहासाचे जाणकार असलेले पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की पहिल्यांदाच पंतप्रधानाच्या उपस्थित कोणता नेता डॉ. हेडगेवार स्मृति मंदिर परिसरात येत आहे. ते पुढे म्हणाले की अटलबिहारी वाजपेयी यांनी साल २००७ मध्ये स्मारकाचा दौरा केला होता. परंतू त्यावेळी ते प्रतप्रधान नव्हते.

पंतप्रधान एक प्रचारक म्हणून स्मारक परिसरात आले होते. परंतू पंतप्रधान बनल्यानंतर ते पहिल्यांदाच येणार आहेत. पंतप्रधान दुपारी १२ वाजता नागपूरातील सोलर डिफेन्स एंड एअरोस्पेस लिमिटेडमध्ये मानवरहित विमानांच्या उड्डाणांसाठी अवजारे, चाचणी रेंज, आणि रनवेचे उद्घाटन करतील.

नवीन विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

PMO कार्यालयाने म्हटले आहे की, पायाभूत सुविधांचा विकास आणि शाश्वत विकासासाठी बिलासपूर येथे वीज, तेल आणि वायू, रेल्वे, रस्ते, शिक्षण आणि गृहनिर्माण क्षेत्रांशी संबंधित ३३,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील आणि काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.

थर्मल पॉवर प्रोजेक्टची पायाभरणी

पीएमओने म्हटले आहे की, “पंतप्रधान देशभरातील वीज क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहेत. यासोबतच, स्वस्त आणि विश्वासार्ह वीज पुरवण्यासाठी आणि छत्तीसगडला वीज निर्मितीत स्वयंपूर्ण करण्यासाठी अनेक पावले उचलली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी विलासपूर जिल्ह्यातील ९,७९० कोटी रुपयांच्या एनटीपीसीच्या सिपत सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट स्टेज-III ( १x८०० मेगावॅट ) ची पायाभरणी करतील.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.