PM Modi Live : संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन, मोदींची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा देशाला (PM Narendra Modi speech lockdown) संबोधित केलं. मोदींनी संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले

PM Modi Live : संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन, मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली :  कोरोनामुळे भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याबाबतची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा देशाला (PM Narendra Modi speech lockdown) संबोधित केलं. 

भारतात कोरोनाविरुद्धची लढाई पुढे कशी जाईल, आपण विजयी कसे होऊ, आपल्याकडे नुकसान कमी कसे होईल, लोकांना त्रास कसा होणार नाही, याबाबत राज्य सरकारांसोबत नेहमी चर्चा केली. यावर प्रत्येकाकडून एकच सल्ला दिला गेला आणि तो म्हणजे लॉकडाऊन वाढवला जावा.काही राज्यात तो वाढवला आहे. त्यानुसार भारतात लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला जाणार आहे. त्यानुसार 3 मेपर्यंत आपल्या सर्वांना लॉकडाऊनमध्येच राहावे लागणार आहे. या दरम्यान आपल्याला सर्व नियमांचे पूर्वीप्रमाणेच पालन करायचे आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पहिल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला संबोधित केलं. (PM Narendra Modi speech lockdown). यावेळी पंतप्रधानांनी लॉकडाऊनमध्ये पाळलेल्या संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले. तसंच मोदींनी देशातील कोरोनाची स्थिती पाहता देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण जसेच्या तसे (PM Narendra Modi Speech lockdown2)

नमस्ते माझ्या प्रिय देशबांधवांनो

कोरोना जागतिक महामारीच्या विरोधात भारताची लढाई फार मजबूतीने पुढे जात आहे. तुमच्या सर्व देशातील नागरिकांची तपस्या आणि तुमच्या त्यागामुळे भारताला कोरोनामुळे फार कमी नुकसान झाले आहे.

तुम्ही सर्वांना अनेक त्रासाचा सामना करुन देशाला वाचवलं आहे. आपल्या भारताला वाचवलं आहे.

मला माहिती आहे तुम्हाला फार अडचणींचा सामना करावा लागला आहे. काहींना खाण्याचे कोणला येण्या-जाण्याची, काही जण त्यांच्या कुटुंबापासून दूर आहे. पण तुम्ही देशासाठी एक लढवय्या सैनिकाप्रमाणे तुमचं कर्तव्य करत आहे. त्याबद्दल मी तुम्हाला हात जोडून नमस्कार करतो.

आपल्या संविधानामध्ये we the people of india याचा उल्लेख केला आहे आणि हे तेच आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या सामुहिक शक्तीचे प्रदर्शन हा संकल्प बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे. बाबासाहेबांचे जीवन आपल्याला प्रत्येक संकटाला आपल्या संकल्पशक्ती आणि परीश्रमच्या आधारे पार करण्याची नेहमीच प्रेरणा देते.

मी सर्व देशवासियांच्या वतीने बाबासाहेबांना नमन करतो. हा देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी सण उत्सवाचा वेळ आहे. तसंही भारत हा उत्सवाने भरलेला असतो. बैसाखी, कोहेला बैसाख, यासह अनेक राज्यात नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे.

लॉकडाऊनदरम्यान मी सर्व देशातील लोक ज्या प्रकारे नियमांचे पालन करत आहेत. ज्या संयमाने लोक घरात सण साजरे करतात. हे सर्व प्रेरणादायी आहे.

तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा

संपूर्ण जगात कोरोनाची जी स्थिती आहे ती आपल्याला माहिती आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने कशाप्रकारे आपल्या देशात हा प्रादुर्भाव रोखला आहे. याचे तुम्ही साक्षीदार आहात.

जेव्हा आपल्याकडे कोरोनाचे एकही केस नव्हता तेव्हापासून कोरोना प्रभावित देशातून येणाऱ्यांची स्क्रिनिंग करण्यात येत होती. कोरोनाचे रुग्ण जेव्हा १०० वर पोहोचले त्यापूर्वी इतर देशातून आलेल्या लोकांना १४ दिवसांचे क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

प्रत्येक ठिकाणी मॉल, जिम थिएटर बंद करण्यात आले होते.

जेव्हा आपल्याकडे कोरोनाचे ५५० केस होते. तेव्हा भारताने २१ दिवसांची लॉकडाऊनची घोषणा केली. भारताने ही समस्या वाढावी याचा अजिबात इंतजार केला नाही. तर जशी समस्या दिसली त्यानुसार वेगाने निर्णय घेत त्याच वेळी तो थांबवण्याचा प्रयत्न केला.

हे एक असे संकट आहे यात कोणत्याही देशासोबत तुलना करणे योग्य नाही. पण तरीही काही खऱ्या गोष्टींना तुम्ही नाकारु शकत नाही. मात्र तरीही जगभरातील अनेक मोठमोठ्या देशांचे कोरोनेच आकडे पाहिल तर त्यांच्या तुलनेत भारत खूप सांभाळलेल्या स्थितीत आहे.

अनेक देश हे कोरोना प्रादुर्भावाच्या वेळी आपल्या देशासोबत होते. पण आज त्या देशात भारताच्या तुलनेत कोरोनाचे केस हे २५ ते ३० टक्के वाढले आहेत.

त्या देशात हजारो लोकांचे मृत्यू झाले आहेत. भारताने जर intergrted approch जर अंवलंब केला नसता. जर वेळीच निर्णय घेतले नसते तर आज भारताची स्थिती काय असती याचा विचारही करता येत नाही.

पण गेल्या काही अनुभवांपासून आपण ज्या मार्गावर आहोत. ते आपल्यासाठी योग्य आहे. सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊनचे खूप मोठा फायदा देशाला मिळाला आहे. जर फक्त आर्थिकदुष्ट्या पाहिले तर हे महाग नक्की आहे. पण भारतीयांच्या आयुष्यापुढे याची काहीही तुलना केली जाऊ शकत नाही.

आपल्याकडे जे काही आहे त्या मार्गावरुन भारत पुढे जात आहे. आपण अंवलंब केलेल्या या मार्गाची चर्चा सर्व जगभरात आहे. आणि ते होण स्वाभाविक आहे.

देशातील राज्य सरकारने तसेच अनेक स्वारज्य संस्थानांनीही यात चांगले योगदान दिले आहे. २४ तास आपली जबाबदारी सांभाळली आहे. तसेच परिस्थितीही सांभाळली आहे. पण या सर्व स्थितीतही कोरोना ज्याप्रकारे प्रसार होत आहे. त्याने जगभरात आरोग्य यंत्रणा आणि सरकारला आणखी जास्त सतर्क केलं आहे. भारतातही कोरोनाविरुद्धची लढाई पुढे कशी जाईल आपण विजयी कसे होऊ आपल्याकडे नुकसान कमी कसे होईल. लोकांना त्रास कसा होणार नाही. याबाबत राज्य सरकारसोबत नेहमी चर्चा केली.

यावर प्रत्येकाकडून एकच सल्ला दिला गेला आणि तो म्हणजे लॉकडाऊन वाढवला जावा.

काही राज्यात तो वाढवला आहे. त्यानुसार भारतात लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवले जाणार आहे. त्यानुसार ३ मेपर्यंत आपल्या सर्वांना लॉकडाऊनमध्येच राहावे लागणार आहे. या दरम्यान आपल्याला सर्व नियमांचे पूर्वीप्रमाणेच पालन करायचे आहे.

माझे सर्वांना हात जोडून विनंती आहे आता कोरोनाला आपल्याला नवीन परिसरातील फैलाव करुन द्यायचा नाही. स्थानिक ठिकाणी आता एकही रुग्ण वाढला तर हे आपल्यासाठी चिंताचा विषय असू शकतो. कुठेही जर एकही मृत्यू झाला तर आपली चिंता अजून वाढली पाहिजे. त्यामुळे आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त सतर्कता बाळगली पाहिजे.

ज्या ठिकाणी हॉटस्पॉट होऊ शकतात त्यावर आपल्याला करडी नजर ठेवावी लागेल त्या ठिकाणी कठोर पावलं उचलावी लागतील. नवीन हॉटस्पॉट बनणे हे आपल्याला तपस्येला अजून जास्त चॅलेज देईल. नवीन संकट निर्माण होईल

यासाठी पुढच्या एका आठवड्यात कठोरता अजून जास्त वाढवली जाईल. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक ठिकाणी, जिल्ह्यात, राज्यावर नजर ठेवली जाईल. या ठिकाणी लॉकडाऊनचे किती पालन होत आहे. त्या राज्याने कोरोनापासून किती वाचवले आहे याचे मुल्यांकन होईल.

जे क्षेत्र या अग्निपरीक्षेत यशस्वी होतील. जे आपल्या येथे हॉटस्पॉट जास्त बनवू देणार नाही त्यांना २० एप्रिलपासून काही सूट दिली जाईल. पण लक्षात ठेवा यात काही शर्ती असू शकतात यात अनेक नियम लागू असू शकतात

जर लॉकडाऊनचे नियम तोडले जर कोरोनाचे पाऊल त्या ठिकाणी पडले तर सर्व सूट पुन्हा परत घेतली जाईल. त्यामुळे काहीही लापरवाही करु नका.

याबाबत लवकरच एक गाईडलाईन्स दिली जाईल. २० एप्रिलपासून ज्या क्षेत्रात या सूट लागू होऊ शकतात ते फक्त काही गरीबांना केंद्रस्थानी करुन करण्यात आले आहेत. जे रोजंदारीवर काम करतात. जे रोजच्या कमाईवर आपलं घर चालवतात ते माझे परिवार आहेत.

गरीबांच्या जीवनावर आलेले संकंट दूर करणे हे माझे प्राथमिक कर्तव्य आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून सरकारने त्यांना मदत करणार आहे. नवीन गाईडलाईन्स दरम्यान त्यांचा विचार करण्यात आला आहे.

पूर्ण निष्ठतेने ३ मेपर्यंत लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा.  शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. देशात मुबलक अन्न पुरवठा आहे.

घरातील ज्येष्ठांची, विशेषत: ज्यांना जुना आजार आहे त्यांची जास्त काळजी घ्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, घरगुती मास्क नक्वी वापरा प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालय निर्देशांचे पालन करा. गरम पाणी प्या.  फैलाव रोखण्यासाठी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा, इतरांनाही प्रेरीत करा,शक्य तेवढ्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या, भोजनाची व्यवस्था करा आपल्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांची काळजी घ्या. कुणालाही नोकरीवरून काढू नका. आपले  डॉक्टर, नर्स आरोग्यरक्षकांचा मान राखा. सन्मान करा. ही सप्तपदी विजय प्राप्त करण्याचा मार्ग आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 • अनेक कष्ट सोसून तुम्ही संकटाशी दोन हात करत आहेत, तुम्हाला सलाम, तुमच्या त्यागामुळेच भारत कोरोनाशी लढत आहे, एखाद्या सैनिकाप्रमाणे कर्तव्य निभावत आहात
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला नागरिकांनी संयम दाखवत खरी श्रद्धांजली दिली – पंतप्रधान नरेंद्र मोदी लाइव्ह
 • अन्य देशांच्या तुलनेत भारताने कसा कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला, याचे तुम्ही सहभागी आणि साक्षीदार आहात – पंतप्रधान नरेंद्र मोदी लाइव्ह
 • भारतात कोरोना केस सापडण्याआधीच आपण परदेश सीमा बंद केल्या, समस्या वाढण्याची वेळ पहिली नाही, समस्या दिसताच ती थांबवण्याचा निर्णय घेतला
 • इतर देशांशी तुलना करण्याची वेळ नाही, पण आपली स्थिती जगातील महासत्तांच्या तुलनेत आटोक्यात आहे
 • भारताने वेगवान निर्णय घेतले नसते, तर काय स्थिती असती, याची कल्पना करूनही अंगावर शहारे येतात, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा मोठा लाभ, याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली, पण जीवापुढे याचं मोल नाही
 • राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांचं मोलाचं कार्य, कोरोना ज्या वेगाने वाढत आहे, त्याने आर्थिक तज्ज्ञही आवक, लॉकडाऊन वाढवण्यात यावा हा उपाय वारंवार समोर येत आहे
 • भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात येत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी लाइव्ह
 • पुढच्या काळात शिस्तीने वागणं आवश्यक आहे, अधिक सतर्कता बाळगायला हवी, कठोर पावलं उचलावी लागतील, नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणं महत्त्वाचं
 • 20 एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचं मूल्यांकन, जे क्षेत्र आपलं हॉटस्पॉट वाढू देणार नाहीत, तिथे काही आवश्यक गोष्टींना सूट किंवा सशर्त अनुमती देण्याचा विचार करू- पंतप्रधान नरेंद्र मोदी लाइव्ह
 • सरकार उद्या विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी लाइव्ह
 • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या गरीब मजुरांसाठी विशेष प्रयत्न – पंतप्रधान नरेंद्र मोदी लाइव्ह
 • कोरोनाचे 10 हजार रुग्ण झाल्यावर 1500-1600 बेड्स असावे, असा जागतिक अनुभव, आपल्याकडे 2 लाख बेड्स आणि 600 कोविड रुग्णालये
 • युवा वैज्ञानिकांनो पुढे या, कोरोनावर लास शोधा – पंतप्रधान नरेंद्र मोदी लाइव्ह

सात गोष्टींवर साथ द्या –

१. जुने आजार असलेल्या वृद्धांची काळजी घ्या

२. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पाळा, मास्क घाला

३. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या सूचना पाळा

४. आरोग्यसेतू app download करा

५. गरीब कुटुंबांची काळजी घ्या

६. कोणालाही नोकरीवरून काढू नका

७. कोरोनायोद्धे – डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांचा गौरव करा

पंतप्रधान मोदींचे 26 दिवसातील चौथे संबोधन

1. 19 मार्च – 29 मिनिटांचे भाषण, 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन, टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन
2. 24 मार्च – 29 मिनिटांचे भाषण, 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा
3. 3 एप्रिल – 12 मिनिटांचा व्हिडीओ संदेश, 5 एप्रिलला 9 वाजता 9 मिनिटे दीपत्कार करण्याचं आवाहन
4. 14 एप्रिल – आज संबोधन


Published On - 10:10 am, Tue, 14 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI