AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

राष्ट्रीय स्तरावर कोणते निर्बंध असतील, कशामध्ये शिथिलता येईल, मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्राकडून कोणत्या घोषणा होणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. (Prime Minister Narendra Modi to address the nation)

लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार
| Updated on: Apr 13, 2020 | 3:37 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (14 एप्रिल) सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा उद्या शेवटचा दिवस आहे. ‘कोरोना व्हायरस’चा वाढता प्रादुर्भाव पाहता मोदी लॉकडाऊनची मुदत वाढवणार, टप्प्याटप्प्याने उठवणार की प्रत्येक राज्यावर निर्णय सोपवणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. (Prime Minister Narendra Modi to address the nation)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. बहुतांश राज्यांनी पंतप्रधान मोदींकडे लॉकडाऊनमध्ये मुदतवाढ करण्याची विनंती केली आहे. परंतु राष्ट्रीय स्तरावर कोणते निर्बंध असतील, कशामध्ये शिथिलता येईल, मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्राकडून कोणत्या घोषणा होणार, ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी काय उपाययोजना आखल्या जाणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मोदींच्या भाषणात मिळण्याची आशा आहे.

देशातील ‘कोरोना’ हॉटस्पॉटमधील निर्बंध अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. तर प्रादुर्भाव कमी असलेल्या राज्यात टप्प्याटप्प्याने ते शिथील होण्याची चिन्ह आहेत. संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढणार की प्रत्येक राज्यावर निर्णय सोपवला जाणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कोरोनाच्या संसर्गाच्या तीव्रतेवर आधारित जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्याचा प्रस्ताव आहे. जवळजवळ 400 जिल्हे ग्रीन झोनमध्ये असू शकतात. तिथे सोशल डिस्टन्सिंग लक्षात ठेवून कृषी, बांधकाम आणि उत्पादन कामे सुरु करता येतील.

(Prime Minister Narendra Modi to address the nation)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मोदी स्वत: मास्क घालून बसले होते. विशेष म्हणजे त्यांनी घरगुती रुमालाने हा मास्क तयार केला होता.

संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढवला पाहिजे. कोणत्याही एखाद्या राज्यात लॉकडाऊन हटवणं योग्य नाही, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केलं.

मुख्यमंत्र्यांनी मला कधीही सल्ले द्यावे, मी 24 तास उपलब्ध आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले होते. केंद्र सरकारने वैद्यकीय उपकरणे, मदत राज्यांना द्यावी, तसेच आर्थिक मदतही द्यावी अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली होती.

आपण एकजुटीने, खांद्याला खांदा देऊन लढू, असे मोदी यावेळी म्हणाले होते. थोडीशी शिथीलता आणून लॉकडाऊन वाढू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Prime Minister Narendra Modi to address the nation)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.