AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडे डोळे वटारुन बघितलं तर…, आदमपूर एअर बेसवरून मोदी कडाडले, पाकिस्तानला इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमध्ये असलेल्या आदमपूर एअर बेसला भेट दिली. तिथे त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या भारतीय जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे.

भारताकडे डोळे वटारुन बघितलं तर..., आदमपूर एअर बेसवरून मोदी कडाडले, पाकिस्तानला इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2025 | 4:05 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमध्ये असलेल्या आदमपूर एअर बेसला भेट दिली. तिथे त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या भारतीय जवानांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारत ही बुद्धांची भूमी आहे, तसेच ती गुरु गोविंद सिंह यांची देखील भूमी आहे,  भारताकडे डोळे वटारुन बघितलं तर खात्माच होणार, असं मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे.  भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली, मी देशाच्या सशस्त्र दलाला सलाम करतो, तुम्ही पुढच्या पिढीसाठी प्रेरणा बनला आहात असं मोदी यांनी यावेळी म्हटलं.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी? 

विरांच्या धरतीवरून नेव्ही, आर्म फोर्स आणि हवाई दलाच्या सर्व जवानांना सॅल्यूट करतो. नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा बनला आहात. तुमच्या पराक्रमामुळे आज ऑपरेशन सिंदूरचा आवाज प्रत्येक कानाकोपऱ्यात घुमत आहे. या ऑपरेश दरम्यान प्रत्येक भारतीय तुमच्या सोबत होता. प्रत्येक भारतीयांची प्रार्थना तुमच्या सोबत होती. आज प्रत्येक नागरिक आपल्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञ आहे, त्यांचा ऋणी आहे. ऑपरेशन सिंदूर ही सामान्य सैन्य मोहीम नाहीये. ही भारताची नीती, नियत आणि निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे. भारत ही बुद्धांची भूमी आहे, तसेच ती गुरु गोविंद सिंह यांची देखील भूमी आहे, भारताकडे डोळे वटारुन बघात तर खात्माच होईल असं मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, अधर्माचा नाश, धर्माच्या स्थापनेसाठी शस्त्र उचलणं ही आपली परंपरा आहे. जेव्हा आपल्या मुली, बहिणींचं कुंकू पुसलं गेलं तेव्हा अतिरेक्यांचा फणा आपण त्यांच्या घरात घुसून ठेचला. ते भेदरटपणे लपले होते. पण त्यांनी ज्यांना आव्हान दिलं ती हिंदची सेना आहे हे ते विसरले होते. आपण दहशतवाद्यांचे पंख छाटले आहेत, दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...