मराठी साहित्य संमेलनात ‘छावा’ची धूम, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…
Prime Minister Narendra Modi speech: मुंबईने मराठीसह हिंदी सिनेमालाही उंचीवर नेऊन ठेवली आहे. आता तर छावाची धूम सुरू आहे. संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या कादंबरीनेच करून दिला आहे. भारत जगातील सर्वात प्राचीन सभ्यतेपैकी एक आहे.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: सध्या देशभर छावा चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास कोट्यवधी लोकांपर्यंत गेला. या चित्रपटाने अनेक विक्रम तयार केला. छावा चित्रपटाबद्दल प्रत्येकाला आकर्षण वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही छावा चित्रपटाने मोहिनी घातल्याचे दिसून आले. नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना त्यांनी त्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, छावाची धूम सुरू आहे. संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या कादंबरीनेच करून दिला आहे.
मुंबईने मराठीसह हिंदी सिनेमालाही नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. भारत जगातील सर्वात प्राचीन सभ्यतेपैकी एक आहे. साहित्य समाजाचा आरसा आहे. साहित्य समाजाचे पथप्रदर्शक आहे. त्यामुळे साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमाची देशात महत्त्वाची भूमिका असते. गोविंद रानडे, हरी नारायण आपटे, आचार्य अत्रे, सावरकर यांनी आदर्श निर्माण केले आहे. साहित्य महामंडळ ही परंपरा पुढे नेईल अशी आशा करतो, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
संघामुळे मराठी शिकलो
दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मी तुमच्या प्रमाणे मराठी भाषा बोलू शकत नाही. परंतु नवनवीन मराठी शब्द शिकण्याचा आणि बोलण्याचा मी नेहमी प्रयत्न करत आलो. आज तर जागतिक मातृभाषा दिवस आहे. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनासाठी तुम्ही दिवस पण चांगला दिवस निवडाला. माझ्यासारख्या लाखो लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली. संघामुळेच मी मराठी भाषेशी जोडलो गेलो.
महाराष्ट्रातील संतांनी देशाला अध्यात्मिक उर्जा दिली
भाषा समाजात जन्म घेतात. पण समाजाच्या निर्मितीसाठी महत्वाची भूमिका बाजवत असते. मी जेव्हा मराठीचा विचार करतो तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग आठवतो. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परि अमृतासेही पैजासे जिंके. मराठी भाषा अमृताहून गोड आहे. त्यामुळे मराठीबाबत माझे प्रेम आहे. ते तुम्हाला माहीतच आहे. भारताला अध्यात्मिक उर्जाची गरज होती तेव्हा महाष्ट्रातील संतांनी ती पूर्ण केली. मराठीतील अनेक संतांनी भक्ती आंदोलनातून समाजाला नवीन दिशा दिली. समृद्ध दलित साहित्य मराठी भाषेने देशाला दिले. विज्ञान साहित्य दिले. नवीन विचार, नवीन प्रतिभा महाराष्ट्राने दिली.
