PM Narendra Modi | कोरोनाने चिंता वाढवली, पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

देशातील आणि सर्व राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे.

PM Narendra Modi | कोरोनाने चिंता वाढवली, पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादूर्भाव (Corona Virus) गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Narendra Modi) सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी (Chief Minister) बैठक घेणार आहेत. 24 नोव्हेंबरला सकाळी 10 किंवा 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. ही बैठक 2 टप्प्यांमध्ये पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या राज्यातील कोरोना केसेसची संख्या जास्त आहे, त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान सर्वात आधी बैठक घेणार आहेत. म्हणजेच पहिल्या टप्प्यातील बैठकीमध्ये महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील. prime minister narendra modi will hold discussions with the chief ministers of all the states on november 24 2020

पंतप्रधान मोदी बैठकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राज्यांचे मुख्यमंत्री या महत्वाच्या बैठकीत सामील होतील. दुसऱ्या टप्प्यातील बैठकीला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे.

‘या’ विषयावर होणार चर्चा

या महत्वाच्या बैठकीत प्रत्येक राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच लस वितरणाच्या धोरणासंदर्भात मुख्यमंत्री चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधीही उपस्थित असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींनी याआधी वेळोवेळी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्याशी बैठका घेतल्या आहेत.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या

देशभरात 91 लाख 29 हजार 3 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 1 लाख 33हजार 589 जणांचा मृत्यू झाला. तर 85 लाख 50 हजार 931 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

लॉकडाऊन वाढवणार का?

राज्यासह देशामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन करायचा का, या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या

महाराष्ट्रात आज (22 नोव्हेंबर) एकूण 5 हजार 753 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 60 रुगण कोरोनामुक्त झाले आहे. ताज्या आकडेवारीनुसार 16 लाख 51 हजार 64 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 81 हजार 512 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92.75% इतकं आहे.

अहमदाबादमध्ये नाईट कर्फ्यू

गुजरातमधील अहमदाबादमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवार 20 नोव्हेंबरपासून अहमदाबादमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान हा कर्फ्यू असणार आहे.

संबंधित बातम्या :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची शक्यता, नागरिकांना जवानांच्या नावे दिवा लावण्याचे आवाहन

prime minister narendra modi will hold discussions with the chief ministers of all the states on november 24 2020

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *