1 लाख प्रशिक्षित NCC कॅडेट्स कोस्टल आणि सीमाभागात काम करणार- पंतप्रधान मोदी

NCC कडे मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केली आहे.

1 लाख प्रशिक्षित NCC कॅडेट्स कोस्टल आणि सीमाभागात काम करणार- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : राष्ट्रीय कॅडेट कोर अर्थात NCCच्या विद्यार्थ्यांकडे मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केली आहे. दिल्लीच्या करियप्पा ग्राऊंड इथं पंतप्रधान मोदी NCCच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली होती की, कोस्टल आणि सीमाभागातील जवळपास 175 जिल्ह्यांमध्ये NCCला नवी जबाबदारी दिली जाईल. त्यासाठी लष्कर, नोसेना आणि वायुसेनाद्वारे जवळपास 1 लाख NCC कॅडेट्सना प्रशिक्षित केलं जात आहे.(PM Narendra Modi’s big statement about NCC)

पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर

करियप्पा ग्राऊंड इथं NCCची रॅली झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सैन्याच्या तिनही दलांचे प्रमुख उपस्थित होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी NCC कॅडेट्सना संबोधित केलं. महापूर किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत NCC कॅडेस्टनी लोकांची मदत केली आहे. कोरोना काळातही कॅडेट्सनी समाजसेवा करुन प्रशासनाची मदत केली. जगभरातील सर्वात मोठ्या यूनिफॉर्म यूथ ऑर्गनायझेशनच्या रुपात NCC प्रत्येक दिवशी अधिक मजबूत होत आहे. शौर्य आणि सेवाभाव, तसंच भारतीय परंपरा जिथे रुजवण्यात येत आहे. तिथ NCC कॅडेट दिसून येतात, अशा शब्दात मोदींनी NCCचं कौतुक केलं.

एक तृतियांश मुलींचा सहभाग

कोरोना काळात लाखो NCC कॅडेट्सनी देशभरात ज्या प्रकारे प्रशासन आणि समाजासोबत मिळून काम केलं ते प्रशंसनीय आहे. आपल्या संविधानात सांगितलेली नागरिकांची कर्तव्ये पार पाडणं ही सर्वांची जबाबदारी आहे. सरकारने NCCची भूमिका व्यापक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या सीमा, जमीन आणि समुद्र दोन्ही जोडण्यासाठी NCCची भागिदारी वाढवण्यात येत आहे. गेल्यावर्षी 15 ऑगस्टला घोषणा करण्यात आली होती की, कोस्टल आणि सीमाभागात देशाच्या 175 जिल्ह्यांमध्ये NCCला नवी जबाबदारी दिली जाईल. त्यासाठी आमचे तिनी सैन्यदल जवळपास 1 लाख NCC कॅडेट्सला प्रशिक्षित केलं जात आहे. यात एक तृतियांश आमच्या मुली आहेत, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दोन रुग्णालयांना भेट; जखमींची केली विचारपूस

PM Kisan: लवकरच 1.6 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये, अर्जात त्रुटी असेल तर काय कराल?

PM Narendra Modi’s big statement about NCC

Published On - 4:47 pm, Thu, 28 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI