AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : किती वर्ष झाले इकडे? काय इच्छा काय तुझी?; नरेंद्र मोदी कुवैतमध्ये मुस्लिम व्यक्तीशी चक्क मराठीत बोलतात तेव्हा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कुवैत दौऱ्यामध्ये एका मुस्लिम व्यक्तीशी चक्क मराठीमध्ये संवाद साधला आहे. याचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

Video : किती वर्ष झाले इकडे? काय इच्छा काय तुझी?; नरेंद्र मोदी कुवैतमध्ये मुस्लिम व्यक्तीशी चक्क मराठीत बोलतात तेव्हा...
| Updated on: Dec 24, 2024 | 8:42 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या कुवैत दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवैत दौरा खास होता. कारण 43 वर्षानंतर कुवैत दौऱ्यावर जाणारे पंतप्रधान मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी फक्त इंदिरा गांधी यांनी कुवैतचा दैरा केला होता. कुवैत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवैतचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला  ‘ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ देऊन सन्मानित करण्यात आलं. कुवैतचे अमीर शेख मीशाल अल-अहमद अल-जाबीर अल-साबह यांनी पंतप्रधान मोदींना या पुरस्कराने सन्मानित केलं.

दरम्यान याच दौऱ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका कुवैतमध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रीयन मुस्लिम व्यक्तीशी मराठीमध्ये संवाद साधत आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?  

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्यक्तीला मराठीमधून प्रश्न विचारत आहेत की किती वर्ष झाले तुम्ही इकडे काम करतात, तेव्हा तो व्यक्ती म्हणतो नऊ वर्ष झाली. त्यानंतर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्यक्तीला प्रश्न करतात की मग आणखी काय विशेष तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की काही नाही, मी माझ्या एका मुलीला शिकवून तिचं लग्न केलं. तेव्हा पंतप्रधान मोदी पुन्हा त्याला प्रश्न करतात की कुठे लग्न केलं तेव्हा तो म्हणतो तिकडे गावी रत्नागिरीमध्ये

त्यानंतर पुन्हा मोदी त्याला विचारतात मग आता तुझी इच्छा काय आहे, तु पुढे काय करणार आहेस. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की आता मी माझ्या एका मुलीचं लग्न केलं आहे, तिच्या जबाबदारीमधून मोकळ झालो आहे. आता मी माझ्या मुलांना खूप शिकवणार आहे.  तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणतात की,’ शिकव खूप चांगला विचार केला आहेस तू. प्रत्येकानं आयुष्यात एक गोष्टी निश्चित करायला पाहिजे की आयुष्यात काहीही झालं तरी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. थोडा त्रास होईल पण मुलांना चांगलं शिक्षण मिळायला हवं, असं मोदींंनी म्हटलं आहे.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर