प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांची लव्ह स्टोरी

नवी दिल्ली : यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी प्रियांका गांधी यांची वर्णी लागली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली. प्रियांका गांधींनी राजकारणात यावं, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा होती. प्रियांका गांधींची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे …

प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांची लव्ह स्टोरी

नवी दिल्ली : यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी प्रियांका गांधी यांची वर्णी लागली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली. प्रियांका गांधींनी राजकारणात यावं, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा होती. प्रियांका गांधींची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे आणि याचाच फायदा काँग्रेसला होईल, असं बोललं जातंय. प्रियांका यांचं खाजगी आयुष्यही तेवढंच मजेशीर आहे.

गांधी घराण्याची मुलगी असलेल्या प्रियांका गांधी यांची लव्ह स्टोरी ऐकायला कुणाला आवडणार नाही. रॉबर्ट वाड्रा आणि प्रियांका यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. रॉबर्ट वाड्रा यांच्या वडिलांचा या लग्नाला सुरुवातीला विरोध होता. पण नंतर ते तयार झाल्याचं बोललं जातं.

रॉबर्ट वाड्रा आणि प्रियांका यांची पहिली भेट वयाच्या 13 व्या वर्षी झाली. प्रियांका यांचा मनमिळावू स्वभाव यामुळेच दोघांची मैत्री वाढत गेली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. रॉबर्ट वाड्रा आणि प्रियांका गांधी दिल्लीतील ब्रिटीश स्कूलमध्ये शिकत होते. एका मित्राच्या घरी त्यांची भेट झाली होती.

रॉबर्ट वाड्रा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत सांगितलं होतं. दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं कुणालाही माहित होऊ द्यायचं नव्हतं. कारण, लोक याचा वेगळाच अर्थ काढतात, असं ते म्हणाले होते. प्रियांकासोबत रिलेशनशीपबाबत एकांतात बसून गांभीर्याने चर्चा केली होती, असंही ते सांगतात.

प्रियांका गांधींनीही एका मुलाखतीत लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं होतं. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझं वय केवळ 13 वर्षे होतं, असं त्या म्हणाल्या होत्या. ते (वाड्रा) इतर मित्रांना जसे भेटायचे, तसेच मलाही भेटायचे. ही गोष्ट मला आवडत नव्हती, असंही प्रियांका म्हणाल्या होत्या.

दोघांनी लग्नाचा विचार केल्यानंतर ही गोष्ट कुटुंबीयांना सांगितली. या नात्यासाठी रॉबर्ट वाड्रा यांचे वडील तयार नव्हते, असं बोललं जातं. पण नंतर ते तयार झाले. फेब्रुवारी 1997 मध्ये दोघांनी लग्न केलं. आज त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रॉबर्ट यांच्या मते, मुलांची जबाबदारी प्रियांकाच सांभाळतात आणि घरातील खर्चाची जबाबदारी रॉबर्ट यांच्यावर असते.

प्रियांका गांधी देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबातील होत्या, तर रॉबर्ट हे उद्योगपती घराण्यातले होते. त्यामुळेच दोघांनीही रिलेशनशीपबद्दल कधीही माहिती समोर येऊ दिली नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *