AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीला विलंब; राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

या याचिकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. | governor bhagat singh koshyari

विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीला विलंब; राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
| Updated on: Dec 01, 2020 | 11:20 PM
Share

नवी दिल्ली: विधानपरिषदेतील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीला होत असलेल्या विलंबामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Public interest litigation in SC over delay in 12 MLC induction in Maharashtra)

प्राथमिक माहितीनुसार, अधिवक्ते राज पाटील यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. 12 राज्यपाल नियुक्ती विधान परिषद आमदार च्या नियुक्तीला होत असलेला विलंब, भारतीय संविधानानुसार उमेदवारांची पात्रता आदी विषय याचिकेत नमूद करण्यात आले आहेत. तसेच विधानपरिषदेतील आमदारांची निवड ही संवैधानिक पात्रतेनुसार नव्हे तर राजकीय आधारावर केली जाते, यावरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे 12 सदस्यांची यादी देऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी त्यानंतर कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना अधूनमधून याची आठवण करुन देत असतात.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राज्यपालांनी विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीबाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. राज्य मंत्रिमंडळाने सुचविलेली 12 नावे योग्य आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळाने केलेल्या सूचना राज्यपाल डावलत नाही, अशी प्रथा आपल्याकडे आहे. मात्र, पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्था आणि प्रथा मोडण्यात भाजपचा हातखंडा आहे. परंतु, राज्यपाल हे स्वतंत्र विचारांचे असल्याने ते लवकरच मंत्रिमंडळाने सुचविलेल्या नावांना मान्यता देतील, अशी खोचक टिप्पणीही जयंत पाटील यांनी केली होती.

‘झहीर खान, मकरंद अनासपुरे, इंदोरीकरांना आमदार करा’

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे सुचविली होती. यामध्ये मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या:

राज्यपालनियुक्त आमदारांची केस आता हायकोर्टात

पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही; खडसेंचा भाजपला टोला

जुन्या परंपरा मोडीत काढण्यात भाजपचा हातखंडा; राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून जयंत पाटलांचा टोला

(Public interest litigation in SC over delay in 12 MLC induction in Maharashtra)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.