जीवाला धोका असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांच्याकडून मागे,काँग्रेस म्हणाली वकीलांनी न विचारताच कोर्टात दावा केला

राहुल गांधी यांच्याकडून सावरकर बदनामी खटल्यातील तक्रारदारांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे पुणे कोर्टात सांगण्यात आले होते. मात्र राहुल गांधी युटर्न घेत हे वक्तव्य मागे घेतले आहे.

जीवाला धोका असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांच्याकडून मागे,काँग्रेस म्हणाली वकीलांनी न विचारताच कोर्टात दावा केला
Rahul gandhi
| Updated on: Aug 13, 2025 | 9:13 PM

काँग्रेसने पुणे कोर्टातील सावकर अवमान प्रकरणात राहुल गांधी यांच्यावतीने दाखल केलेला जीवाला धोका असलेला दावा अचानक मागे घेतला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी बुधवारी सायंकाळी स्पष्ट केले की राहुल गांधी यांचे हे म्हणणे परवानगी विना कोर्टात सादर करण्यात आले. सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की राहुल गांधी यांच्या वकीलांनी त्यांची परवानगी न घेताच कोर्टात हे म्हणणे मांडले. आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा आधी कोर्टात त्यांनी केला होता.

पुण्याच्या कोर्टात राहुल गांधी यांच्यावर सावरकर अवमान प्रकरणात खटला सुरु आहे. यावेळी कोर्टात आधी राहुल गांधी यांनी तक्रारदार हे नथुराम गोडसेचे वंशज आहेत आणि आपल्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे असे त्यांच्या वकीलांच्या मार्फत सांगण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र आता पुन्हा घुमजाव केल्याने या वक्तव्यातील हवाच निघून गेली आहे. काँग्रेसच्या अचानक घेतलेल्या युटर्नमुळे आता वेगळेच वळण मिळाले आहे.

येथे पाहा पोस्ट –

सुप्रिया श्रीनेत यांनी राहुल गांधी यांच्या वकीलांचे एक वक्तव्य देखील जारी केले आहे. त्यात ते म्हणतात की मी कोर्टात माझ्या अशिलाच्या निर्देशांशिवायच राहुल गांधी यांचा लेखी जबाब सादर केला.यात जे काही लिहिले आहे. त्यास राहुल गांधी यांच्या सल्ल्या शिवाय तयार केले होते. माझ्या अशिलाने अशा प्रकारचा जबाब दाखल केल्याबद्दल खूपच आपत्ती दर्ज केली आहे. उद्या कोर्टासमोर आपण हा अर्ज मागे घेण्यासाठी विनवणी करणार असल्याचेही राहुल गांधी यांचे वकीलांनी म्हटले आहे.

आधी काय म्हटले होते वकीलांनी ?

राहुल गांधी यांच्या वकीलांनी कोर्टात सादर केलेल्या जबाबात आपल्या अशिलाच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. विनायक दामोदर सावरकर यांचे पुतणे सात्यकी सावरकर, भाजपाचे नेते रवनीत सिंह बिट्टू, तरविंदर सिंह मारवाह, अश्व‍िनी वैष्‍णव आणि सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्यांचा आधार घेत हा दावा केला होता. परंतू नंतर राहुल गांधी यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर हा जबाब मागे घेण्यात येणार आहे.