AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या जीवाला धोका, राहुल गांधी पुणे कोर्टात म्हणाले की तक्रारदार गोडसेचे वंशज ते मला…

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की या केसचे तक्रारदार नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचे वंशज आहेत.त्यांचा इतिहास हिंसक गतीविधींशी जोडलेला आहे. या दरम्यान राहुल यांनी रवनीत बिट्टू आणि तरविंदर सिंह मारवाह यांचाही उल्लेख केला.

माझ्या जीवाला धोका, राहुल गांधी पुणे कोर्टात म्हणाले की तक्रारदार गोडसेचे वंशज ते मला...
rahul gandhi file photo
| Updated on: Aug 13, 2025 | 6:39 PM
Share

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुण्याच्या विशेष कोर्टात आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की स्वातंत्र्य वीर सावरकर संदर्भातील वक्तव्याने माझ्या जीवाला धोका आहे. दोन नेत्यांनी मला धमकी दिली होती. कोर्टात राहुल गांधी यांनी आपल्याला संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित बदनामीचा हा खटला असून ज्यात तक्रारदाराच्या तक्रारीनंतर राहुल गांधी यांच्यावर खटला दाखल केला आहे.

राहुल गांधी यांच्यावतीने वकील मिलिंद दत्तात्रय पवार यांनी कोर्टात लिखित निवेदन देऊन तक्रारदार नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचे वंशज आहेत, त्यांची पार्श्वभूमी हिंसक कारवायांशी संबंधित आहे.सध्याचा राजकीय वातावरण पाहाता आणि काही नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांनी राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे गांधी यांच्या वकीलांनी कोर्टाला सांगितले.कोर्टाने हा मुद्दा विचारात घेतला आहे.

तक्रारकर्ते नथुराम गोडसेचे वंशज

राहुल गांधी यांनी सांगितले की तक्रारकर्ता नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचे वंशज आहेत. त्यांचा इतिहास हिंसक गतिविधींशी जोडलेला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी रवनीत सिंह बिट्टू आणि तरविंदर सिंह मारवाह यांचा देखील उल्लेख केला.

रवनीत यांनी राहुल यांना अतिरेकी म्हटले होते – राहुल गांधी यांच्या अर्जात रवनीत सिंह बिट्टू यांचे नाव आहे. रवनीत याने राहुल गांधी यांना देशातले अतिरेकी नंबर एक असल्याचे म्हटले होते. याशिवाय याचिकेत तरविंदर सिंह मारवाह यांचेही नाव आहे. मारवाह यानेही राहुल गांधी यांना धमकी दिली होती. तरविंदर सिंह याने राहुल गांधी यांचे हाल त्यांच्या आजी सारखे होतील. राहुल यांच्या वकीलांनी कोर्टाला विनंती केली की राहुल गांधी यांना अतिरिक्त संरक्षण देण्याची मागणी केली.

सावरकर यांच्या पणतूची तक्रार

विनायक दामोदर सावरकर यांचे पणूत सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे कोर्टात तक्रार दाखल केली होती. यात राहुल गांधी यांनी लंडन येथे एका भाषणात म्हटले होते की सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केला आहे की त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी एक मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली आणि त्यामुळे त्यांना आनंद झाला. सात्यकी यांनी या दावा फेटाळत असा कोणता उल्लेख सावरकर यांच्या लिखाणात नाही.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?