AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी, फिरोजपूरचा एसएसपी निलंबित; पंजाब सरकारची तडकाफडकी कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्यानंतर मोदींना पंजाब दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे मोदी प्रचंड संतापले आहेत. या घटनेची पंजाब सरकारने गंभीर दखल घेतली असून फिरोजपूरच्या एसएसपीला निलंबित करण्यात आलं आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी, फिरोजपूरचा एसएसपी निलंबित; पंजाब सरकारची तडकाफडकी कारवाई
CM Charanjit Singh Channi
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 6:50 PM
Share

चंदीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्यानंतर मोदींना पंजाब दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे मोदी प्रचंड संतापले आहेत. या घटनेची पंजाब सरकारने गंभीर दखल घेतली असून फिरोजपूरच्या एसएसपीला निलंबित करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबच्या दौऱ्यावर होते. भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी त्यांना रस्तेमार्गे जायचं होतं. त्यांना सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जायचं होतं. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तासआधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला. काही आंदोलकांनी रस्ता रोको केला होता. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते. त्यावर मोदींनी संताप व्यक्त केला. मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

ही चिंताजनक घटना

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. ‘पंजाब सरकारने दाखवून दिलं की ते विकासविरोधी आहेत आणि आपल्या स्वातंत्र्यसेनानींबद्दल त्यांच्या मनात आदर नाही. ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक होती. हे खूप चिंताजनक आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचे सुपुत्र सरदार भगतसिंह आणि अन्य शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार होते. सोबतच राज्यातील प्रमुख विकासकामांचं भूमिपूजन ते करणार होते’, असं नड्डा यांनी म्हटलं आहे.

नड्डांना प्रत्युत्तर

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी नड्डा यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ‘प्रिय नड्डाजी, पंतप्रधान मोदी यांची रॅली रद्द होण्यामागे मुख्य कारण हे रिकाम्या खुर्च्या होतं. विश्वास बसत नसेल तर हे पाहा. अर्थहीन भाषणबाजी नको. शेतकरी विरोधी मानसिकतेचं सत्य स्विकारा आणि आत्मचिंतन करा. पंजाबमधील जनतेनं रॅलीपासून दूर राहत अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे’, अशी घणाघाती टीका सुरजेवाला यांनी केलीय.

मोदींचं ट्विट

आपल्या पंजाब दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी एक ट्वीट करुन आपल्या दौऱ्याबाबत माहिती दिली होती. ‘मी आज पंजाबमधील माझ्या बहिण आणि भावांमध्ये असेल. फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात 42 हजार 750 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी केली जाईल. या प्रकल्पांमुळे लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल’, असं ट्वीट मोदी यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या:

PM MODI PUNJAB | समजून घ्या, नेमकं मोदींसोबत पंजाबमध्ये काय झालं? सुरक्षेतली चूक की आणखी काही?

‘पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होतं’, काँग्रेसचा पलटवार, सुरजेवालांनी व्हिडीओही दाखवला!

Punjab | अडकले मोदी, आठवले गांधी! नेमका काय आहे हा प्रकार जो पुन्हा पुन्हा ट्रेन्ड होतोय?

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना