Purvanchal Expressway: पंतप्रधान मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने एक्सप्रेसवेवर उतरले, देशातल्या पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं केलं उद्घाटन

| Updated on: Nov 16, 2021 | 2:19 PM

थोड्याच वेळात या कार्यक्रमात भारतीय हवाई दलाचा एयर शो होणार आहे. C-130J विमानाद्वारे, भारतीय हवाई दलाचे गरूड कमांडो आणि विशेष दलातील कमांडो ग्रुप इन्सर्शन ड्रिल करतील. त्याचबरोबर सुखोई, जग्वार आणि मिराज ही विमाने हवेत त्यांचे उडण्याचे कौशल्य दाखवतील. सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची तीन विमाने तिरंगी सादरीकरणासह करतील.

Purvanchal Expressway: पंतप्रधान मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने एक्सप्रेसवेवर उतरले, देशातल्या पहिल्या हायवे एयर लँडिंग स्ट्रिपचं केलं उद्घाटन
PM Modi landed on Purvanchal Expressway
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने सुलतानपूरमधील करवल खीरी, पूर्वांचल एक्सप्रेसवेवर उतरले. 341 किमी लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेस हायवे आणि त्यावरील तयार केलेलं इमरजेंसी एयर लँडिंग स्ट्रिपचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. हा देशातला पहिला हायवे आहे ज्याचावर इमरजेंसी एयर लँडिंग स्ट्रिप तयार केली गेली आहे.

थोड्याच वेळात या कार्यक्रमात भारतीय हवाई दलाचा एयर शो होणार आहे. C-130J विमानाद्वारे, भारतीय हवाई दलाचे गरूड कमांडो आणि विशेष दलातील कमांडो ग्रुप इन्सर्शन ड्रिल करतील. त्याचबरोबर सुखोई, जग्वार आणि मिराज ही विमाने हवेत त्यांचे उडण्याचे कौशल्य दाखवतील. सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची तीन विमाने तिरंगी सादरीकरण करतील.


देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध राज्यांमध्ये आणखी 19 आपत्कालीन लँडिंग स्ट्रिप तयार केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये राजस्थानमध्ये 3, पश्चिम बंगालमध्ये 3, तामिळनाडूमध्ये 1, आंध्र प्रदेशमध्ये 2, गुजरातमध्ये 2, हरियाणामध्ये 1, पंजाबमध्ये 1, जम्मू-काश्मीरमध्ये 1 आणि आसाममध्ये 5 आपत्कालीन लँडिंगचा समावेश आहे.

हे ही वाचा

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पूर्वांचल एक्सप्रेस वे चे उद्घाटन; सोहळ्यात रंगणार ‘मिराज’ ‘सुखोई’च्या कसरतींचा थरार

1st Audit Day: ‘आधीच्या सरकारांमध्ये NPA वाढतच गेले, आम्ही त्यांचे सत्य देशासमोर मांडले’- पंतप्रधान मोदी