1st Audit Day: देशात NPA का वाढले? पंतप्रधान मोदींचे आधीच्या काँग्रेस सरकारकडे बोट

पंतप्रधान म्हणाले की,"काही दशकांपासून, CAG ची प्रतिमा केवळ फाइल्स चाळणारी एजन्सी अशी राहिली. पण, CAG आता भारताच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे."

1st Audit Day: देशात NPA का वाढले? पंतप्रधान मोदींचे आधीच्या काँग्रेस सरकारकडे बोट
नरेंद्र मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दिल्लीमधल्या कॅग (Comptroller and Auditor General of India- CAG) हेडक्वार्टरमध्ये प्रथम ऑडिट दिवस (Audit day) समारोहसाठी उपस्थीत होते. पंतप्रधान यावेळी म्हणाले की,”काही दशकांपासून, CAG ची प्रतिमा केवळ फाइल्स चाळणारी एजन्सी अशी राहिली. पण, CAG आता भारताच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.”

मोदी म्हणाले की, एक काळ असा होता जेव्हा देशात ऑडिट म्हटलं की लोकांमध्ये भीती होती. ‘CAG विरुद्ध सरकार’ ही आपल्या व्यवस्थेचे विचारधारणा झाली होती. पण, आज ही मानसिकता बदलली आहे. आज ऑडिट हे वैल्यू एडिशनचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, CAG एक संस्था म्हणून केवळ देशाच्या खात्यांची तपासणी करत नाही तर उत्पादकतेच्या कार्यक्षमतेला चालना देखील देते. म्हणून, ऑडिट दिवस आणि त्याच्याशी संबंधित कार्यक्रम हे आपल्या विचारमंथनाचा, आपल्या सुधारणांचा एक महत्त्वाचा भाग आहे.

“पूर्वी देशातील बँकिंग क्षेत्रात पारदर्शकतेच्या अभावामुळे, विविध पद्धतींचा अवलंब केला जात होता. परिणामी बँकांचे एनपीए (Non-Performing Assests) वाढतच गेले. पण, आम्ही आधीच्या सरकारांचे सत्य संपूर्ण प्रामाणिकपणे देशासमोर ठेवले. समस्या ओळखल्या तरच त्यावर उपाय शोधता येतील,” पंतप्रधान म्हणाले.

मोदी म्हणाले की, ‘सरकार सर्वम, सरकार जानम, सरकार गृहम’ (सरकार सर्व आहे) ही जुनी संकल्पना दूर करण्यासाठी केंद्र नवीन धोरणे आणत आहे. संपर्करहित सीमाशुल्क, स्वयंचलित नूतनीकरण, फेसलेस असेसमेंट आणि सेवा वितरणासाठी ऑनलाइन अर्ज यासारख्या उपायांनी सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप दूर केला आहे, पंतप्रधान मोदी म्हणाले.

सरकारच्या धोरणांमुळे भारत आता तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकोसिस्टम बनला आहे, असेही ते म्हणाले.

इतर बातम्या-

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पूर्वांचल एक्सप्रेस वे चे उद्घाटन; सोहळ्यात रंगणार ‘मिराज’ ‘सुखोई’च्या कसरतींचा थरार

पराभव होताच हिमाचल भाजपमध्ये बंडाला सुरुवात; नेत्यांचा थेट राष्ट्रीय अध्यक्षांवरच निशाणा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI