Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे मोठे रॅकेट उघड, असा पकडला मास्टरमाईंड

आपल्या एजन्सीद्वारे आरोपीने १०० हून अधिक बांगलादेशींना परदेशी पाठविले आहे. या बांगलादेशी महिलांचा देखील समावेश आहे. जे लोक सीमा ओलांडून बांगलादेशातून प. बंगालमध्ये शिरकाव करायचे त्यांना बोगस कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून दिला जायचा अशी मोडस ऑपरेंडी होती.

बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे मोठे रॅकेट उघड, असा पकडला मास्टरमाईंड
Passport racket
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 8:02 PM

बांग्लादेशी नागरिकांना नकली कागदपत्रांआधारे भारतीय पासपोर्ट मिळवून देत त्यांना परदेशात पाठविण्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे टूर्स एण्ड ट्रॅव्हल एजन्सी मार्फत हे रॅकेट चालायचे. या ‘टुर्स एण्ड ट्रॅव्हल्स’ कंपनीच्या माध्यमातून या आरोपीने आतापर्यंत १०० बांग्लादेशींना भारतीय पासपोर्ट देऊन परदेशात त्यांची पाठवणूक केली आहे. या प्रकरणात मास्टरमाईंड मनोज गुप्ता याला अटक झाली असून या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या सात इतकी आहे.

मनोज गुप्ता बनावट कागदपत्रांआधारे भारतीय पासपोर्ट तयार करायचा. त्याबदल्यात त्याला लाखो रुपयांची कमाई होत होती. या टोळीत समरेश आणि अन्य साथीदार त्याची मदत करायचे. शनिवारी मनोज गुप्ता याला प. बंगाल पोलिसांनी अटक करुन अलीपूर कोर्टात हजर केले आहे. कोर्टाने त्याला १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प. बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील गायघाटा पोलीस स्टेशन क्षेत्रातील चांदपाडा मोतीलाल गुप्ता रोड येथील कार्यालयातून आरोपी मनोज गुप्ता आपले रॅकेट चालवित होता. समरेश आणि अन्य साथीदार मदत करायचे त्यानंतर भारतीय पासपोर्ट तयार केला जायचा. आणि बांग्लादेशी नागरिकांना भारतीय नागरिक बनविले जात होते. त्यानंतर टुर एंड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या माध्यमातून त्यांना परदेशात पाठवले जायचे. याआधी कोलकाता पोलिसांनी दीपांकर दास नावाच्या व्यक्तीला दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून अटक झाली होती.

पोस्ट ऑफीसची माणसे मॅनेज

आरोपी बांगलादेशींकडून ५ ते १० हजार रुपये घ्यायचा आणि त्यांना आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवून द्यायचा. त्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत सामील करायचा. त्यानंतर खोट्या पत्त्याआधारे त्यांना पासपोर्टसाठी अर्ज करायचा. जेव्हा हे पासपोर्ट पोस्टाने यायचे तेव्हा पोस्ट ऑफीस कार्यालयातील माणसांना मॅनेज करुन ते मिळवायचा. आणि बांग्लादेशी नागरिकांकडून पाच लाख रुपये यासाठी आकारले जायचे असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

महिन्याच्या सुरुवातीला रॅकेट उघड

या महिन्याच्या सुरुवातीला बनावट पासपोर्टचे प्रकरण उघड झाले होते. कोलकाता पोलिसांनी टपाल विभागाच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याला दक्षिण २४ परगणामधील बेहाला येथील पर्णश्री परिसरातून अटक केली होती. त्याआधी पोलिसांनी उत्तर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून दोघांना अटक केली होती. आरोपींकडून हार्ड डिस्क ड्राइव्ह, एक संगणक, अनेक बनावट कागदपत्रे आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.