अमित शहांना पोलिसांशी फोनवर बोलताना मी पाहिलंय…; भाजप, संघाची माफी कधीच मागणार नाही, पत्रकार परिषदेत राहुल गांधी आक्रमक
अधिवेशनात राहुल गांधी यांनी सीजेपीच्या आंदोलनावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमित शाह यांनीच कारवाईचे आदेश दिले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे, दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची पत्रकार परिषद पार पडली आहे.

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सीजेपीच्या आंदोलनावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे, अमित शाह यांनीच कारवाईचे आदेश दिले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर संसदेत वातावरण चांगलंच तापलं, सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली, राहुल गांधी यांनी ती ऑर्डर दाखवावी अन्यथा त्यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी विरोधकांकडून करण्यात आली. गोंधळ वाढल्याने लोकसभेचं कामकाज या काळात तीनदा स्थगित करावं लागलं. दरम्यान त्यानंतर काही वेळात लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. दरम्यान आता राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
‘विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर झाला, एकानं डोळा गमावला’ पोलिसांच्या लाठ्यांना खिळे लावले होते. पोलिसांनी महिला आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांनाही मारलं. विद्यार्थ्यांवरील या क्रूरतेला अमित शाह जबाबदार आहेत. पोलिसांना कोणत्याही कारवाईसाठी गृहमंत्र्यांचे आदेश गरजचे असतात. गृहमंत्र्यांना फोनवरून बोलताना मी स्वत: पाहिलं आहे, दिल्लीत काय घडत होतं, हे शाहांना कळत होतं. मला संसदेत बोलू दिलं नाही, असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभेमध्ये आमचा आवाज दाबला जात आहे, मी लोकसभा अध्यक्षांना अनेकदा विनंती केली की मला बोलू द्या, पण मला बोलू दिलं नाही. किरन रिजजू, राजनाथ सिंहजी आणि इतर सत्ताधारी पक्षातील नेते अनेकदा बोलले परंतु मला लोकसभेत बोलू दिलं नाही, बोलण्याची संधी मिळाली नाही. मला म्हणाले माफी मागा, परंतु मी भाजप आणि संघाची कधीही माफी मागणार नाही, असा हल्लाबोलही यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.