AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बसची हवा काढली, जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, दिल्लीत संग्राम

राहुल गांधी प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी बसच्या चाकांमधली हवा काढली आणि जंतरमंतरकडे जाण्यापासून रोखलं. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी यावेळी रस्त्यावरच ठिय्या देण्याचा निर्णय घेतला होता.

बसची हवा काढली, जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, दिल्लीत संग्राम
राहुल, प्रियंका गांधी पुन्हा एकदा पोलिसांच्या ताब्यात
| Updated on: Oct 07, 2026 | 6:27 PM
Share

राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, तर महिला पोलिसांनी प्रियांका गांधी यांनाही ताब्यात घेतलं आहे. प्रियांका गांधी या रस्त्यावर झोपल्या होत्या. यावेळी वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. खासदारांसोबत अशी वर्तणूक होत आहे. खासदारांना पोलिस मारतात, हे सर्व काय सुरु आहे. आम्हाला फक्त जंतरमंतरवर आंदोलन करायचं होतं. पण तेही का करु देत नाहीत, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता राहुल आणि प्रियांका गांधी दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना अक्षरः उचलून पोलिसांच्या गाडीत नेण्यात आलं.

गेल्या तीन तासांपासून दिल्लीमध्ये हे आंदोलन सुरु आहे. जंतरमंतरकडे निघालेल्या इंडिया आघाडीच्या बसच्या हवा काढण्यात आली. पोलिसांनी हे कृत्य केल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह खासदारांचा संताप पाहायला मिळाला. त्यानंतर रस्त्यावरच ठिय्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व खासदार आणि इंडिया आघाडीचे नेते रस्त्यावर बसले पण पोलिसांनी त्यांना सातत्याने अडवलं. यावेळी पोलिसांनी धरपकड करत राहुल गांधींना पोलिसांनी उचलून नेलं. त्याचवेळी प्रियंका गांधी यांनाही महिला पोलिसांनी उचललं. मोदी, शाह आणि ज्ञानेश कुमारांनी लोकशाही हायजॅक केली असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

दरम्यान, आता पोलिसांच्या गाडीतून राहुल गांधी आणि प्रियंका यांनी हातात संविधान घेतलं आणि ते सर्वांना उंचावून दाखवलं. पण यावेळी मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. बसची हवा काढल्यानंतर प्रियंका खाली उतरल्या तेव्हा अत्यंत संतप्त झाल्या होत्या. त्यांनी बाहेर पडल्यावर प्रचंड मोठा नेत्यांचा रेटा पाहायला मिळाला. प्रियांकांनी ठिय्या दिला तेव्हा त्यांनी सांगितलं की देशाच्या खासदारांसोबत अशा स्वरुपाची वागणून योग्य नाही.

एसआयआर रद्द करा, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या, अशा प्रकारच्या मागण्या करण्यासाठी हे आंदोलन करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते सरसावले आहेत. पण दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतरमंतरवर जाण्याआधीच रोखलं आहे. पोलिस आता ताब्यात घेतलेल्या खासदारांना कुठे घेऊन जाणार याकडे लक्ष लागलं आहे.

Follow Us
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा