AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : ‘मोदी ने मरवा दिया’, काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीत राहुल गांधींचे शब्द

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तृणमुल नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबत बैठका झाल्या. त्यानंतर विरोधी पक्ष एकजुटीच्या नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Rahul Gandhi : 'मोदी ने मरवा दिया', काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीत राहुल गांधींचे शब्द
Rahul Gandhi Image Credit source: PTI
| Updated on: Jun 12, 2026 | 9:28 AM
Share

भीषण गर्मी असूनही गुरुवारी इंदिरा भवनमध्ये पत्रकार मोठ्या संख्येने जमले होते. सर्व जण काँग्रेस नेतृत्वाने बोलवलेल्या आवश्यक बैठकीचं कवरेज करण्यासाठी आले होते. NEET, CBSE, महागाई, बेरोजगारी आणि पेपर लीक या मुद्यांवरुन मोदी सरकार विरोधात रणनिती बनवणं हा या बैठकीचा उद्देश होता. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या बैठकीत सहभागी झाले होते, त्यावरुन या बैठकीचं महत्व लक्षात येतं. चर्चे दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी ने मरवा दिया’अशी टिप्पणी केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर कठोर शब्दात टीका केली.

“बेरोजगारीमुळे देशातील युवक त्रस्त आहेत. परीक्षा पेपर लीक झाल्याने विद्यार्थी हैराण आहेत. परराष्ट्र धोरणातील कमकुवतपणामुळे महागाई वाढतेय. यात सामान्य आणि गरीब नागरिक दोघे प्रभावित होतायत. शेतकऱ्यांना अमेरिकेसोबत होणाऱ्या ट्रेड डीलची चर्चा आहे. संविधानाकडे दुर्लक्ष करुन लोकशाहीला कमजोर केलं जातय” असं राहुल गांधी बोलल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकांना सध्या कठीण परिस्थितीतून जावं लागतय, त्यावर भाष्य करताना ‘मोदी ने मरवा दिया’ असं पटकन राहुल गांधी बोलून गेले. ‘मरवा दिया’ या शब्दाचा अर्थ दुसऱ्यामुळे नुकसान होणं असा होतो. “अर्थव्यवस्थेची हालत इतकी खराब होईल की, वर्षभरानंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत” असं सुद्धा राहुल गांधी याआधी बोलले आहेत.

हे काम फक्त काँग्रेस पक्षच करु शकतो

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तृणमुल नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबत बैठका झाल्या. त्यानंतर विरोधी पक्ष एकजुटीच्या नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या बैठकीत काँग्रेस नेत्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देणं गरजेच असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, ‘काँग्रेसचं एकमेव पक्ष आहे, जो राष्ट्रीय स्तरावर भाजप आणि RSS चा प्रभावीपणे सामना करु शकतो’

देशाव्यापी अभियान सुरु करण्याची घोषणा

राहुल गांधी यांनी पक्ष नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आवाहन केलं. आर्थिक आणि सामाजिक मुद्यांवर जनतेची वाढती नाराजी ही विरोधी पक्षासाठी सर्वसामान्य नागरिकांसोबत कनेक्ट होण्याची संधी आहे असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसने महागाई, वाढत्या किंमती, बेरोजगारी आणि एग्जाम पेपर लीक सारख्या मुद्यांवर देशाव्यापी अभियान सुरु करण्याची घोषणा केली आहे.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...