AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi: राहुल गांधींची मेलोनींवर कमेंट, भारतात फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो? जाणून घ्या A टू Z

Rahul Gandhi Comment on Meloni Controversy: राहुल गांधी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याविषयी एक टिप्पणी केली. दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यक्रमात दरम्यान ही घटना घडली. त्यावरून देशभरात एकच काहूर उठले आहे. भाजप नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. अशा प्रकरणात फौजदारी गुन्हा, मानहानीचा खटला दाखल होऊ शकतो का?

Rahul Gandhi: राहुल गांधींची मेलोनींवर कमेंट, भारतात फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो? जाणून घ्या A टू Z
राहुल गांधी, संदीप दीक्षित, मेलोनी, नरेंद्र मोदीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 4:42 PM
Share

काल दिल्लीत रचनात्मक काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक कमेंट केली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासंबंधानं त्यांनी ही टिप्पणी केली. त्यावरून आता टीकेची झोड उठली आहे. काल चीन आणि पाकिस्तानचा उल्लेख करत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. तर याच कार्यक्रमात काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांची त्यांनी गळाभेट घेतली. त्यावेळी दीक्षितांनी मिश्किलपणे विचारले की, गळा भेट घेताना तुम्ही मला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी समजलात की काय?, अशी टिप्पणी केली. त्यावर राहुल गांधी यांनी माझी पोहोच अजून तिथपर्यंत नाही, असे प्रत्युत्तर दिले. यावरून आता देशात मोठा गदारोळ उठला आहे. हे राजकीय वक्तव्य कायदेशीर कचाट्यात अडकण्याची भीती आहे. परदेशी पंतप्रधान अथवा नेता भारतीय नेत्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करू शकतो का? काय आहे याविषयीची कायदेशीर तरतूद?

परदेशी व्यक्तीला भारतात न्याय मागण्याचा अधिकार

भारतीय कायद्यानुसार, एखादा परदेशी नागरीक हा भारतीय नेत्याविरोधात भारतीय न्यायालयात मानहानीचा अथवा इतर खटला दाखल करू शकतो. त्याला कायदेशीर अडथळा येत नाही. त्याविषयीची तरतूद भारतीय कायद्यात करण्यात आलेली आहे.

नागरी प्रक्रिया संहिता (CPC 1908) : नागरी प्रक्रिया संहिता 1908 मधील कलम 83 ते 87A मध्ये परदेशातील राज्ये, राज्यकर्ते अथवा राजकीय प्रतिनिधींशी संबंधित न्याय प्रक्रियेविषयी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे.

नागरी प्रक्रिया संहितेच्या कलम 84 नुसार, परदेशातील व्यक्ती, संस्था, अधिकृत संघटना, राष्ट्रप्रमुख, राजकी नेता भारतीय न्यायपालिकेत दाद मागू शकतो. हा दिवाणी, नागरी स्वरुपाचा खटला असू शकतो. इतकेच नाही तर भारतात मानहानीचा खटलाही त्याला दाखल करता येतो. अर्थात याविषयीची समिक्षा करण्याचे अधिकार भारतीय न्यायसंस्थेकडे अबाधित आहेत.

आंतरराष्ट्रीय कायदे काय सांगतात?

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, परदेशी नेत्यांना त्यांची प्रतिमा जपण्याचे आणि चारित्र्य हनन रोखण्याचे अधिकार आहेत. परदेशी पंतप्रधान, उच्च पदस्थाला त्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे वाटल्यास तो भारतीय न्यायालयात दाद मागू शकतो. त्याला भारतीय न्यायपालिका अथवा कायदा अटकाव करू शकत नाही. तो भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय नियमानुसारही पुढील प्रक्रिया, कारवाई करू शकतो.

इथे एक महत्त्वाची बाब म्हणजे राजकीय टीका, मिश्किल टिप्पणी याद्वारे थेट मानहानीचा दावा सिद्ध करता येत नाही. विधानाचा हेतू न्यायपालिकेत सिद्ध करणे यासाठी मोठा कस लागतो. मात्र त्या विधानातून अब्रु नुकसान अथवा प्रतिमा मलिन झाली असल्यास फौजदारी तक्रार दाखल करता येते. दिवाणी दावाही न्यायपालिकेत दाखल करता येतो. अर्थात यासाठी आवश्यक तो पुरावा आणि विधानाचा संदर्भ, त्याचा ध्वनीत अर्थ कायद्याच्या कसोटीवर घासून पुसून द्यावा लागतो.

Follow Us
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले