AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi on Adani : गौतम अदानी यांनी कशी घेतली श्रीमंतांच्या यादीत हनुमान उडी! राहुल गांधी म्हणतात, ही तर यांची जादू..

Rahul Gandhi on Adani : हिंडनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ झालेली असतानाच आता विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे.

Rahul Gandhi on Adani : गौतम अदानी यांनी कशी घेतली श्रीमंतांच्या यादीत हनुमान उडी! राहुल गांधी म्हणतात, ही तर यांची जादू..
गांधी यांचा जोरदार वार
| Updated on: Feb 07, 2023 | 6:03 PM
Share

नवी दिल्ली : एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत (Richest List) दुसऱ्या क्रमांकावर असलेले उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. हिंडनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी समूहाची जोरदार पडझड झाली. गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. एवढेच नाही तर एलआयसीसह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचाही जीव टांगणीला लागला आहे. कारण सर्वसामान्यांची मोठी रक्कम अदानी समूहात गुंतविण्यात आलेली आहे. आता विरोधकांनी ही याच मुद्यावरुन केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी तब्बल 50 मिनिटं सरकारवर जोरदार प्रहार केला. केंद्र सरकारच्या हेतूवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले. 2014 मध्ये जगातील श्रीमंतांच्या यादीत अदानी 609 क्रमांकावर होते. त्यानंतर त्यांनी रॉकेट भरारी घेत दुसरा क्रमांक कसा गाठला, असा सवाल करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला.

अदानी यांचा श्रीमंतांच्या यादीतील चढता आलेख थक्क करणारा असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. अदानी आणि पीएम मोदी यांच्यात काय संबंध आहे? असा सवाल करत त्यांनी मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे छायाचित्र दाखवत त्यांनी, ‘ये रिश्ता क्या कहलता है’, असा सवाल केला. त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत गौतम अदानी यांना केंद्र सरकारने अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचा आरोप त्यांनी लोकसभेत केला.

हिंडनबर्गच्या अहवालाचा आधार घेत, त्यांनी अदानी समूहाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीवर शंका घेतली. गौतम अदानी यांनी सहजासहजी अब्जाधिशांच्या यादीत 609 नंबरहून 2 नंबरवर झेप घेतलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्यामुळेच ही कमाल झाल्याचा आरोप गांधी यांनी केला.

संसदेचे बजट सत्र सुरु आहे. या सत्राच्या सहाव्या दिवशी राहुल गांधी यांनी गौतम अदानी मुद्यावर 50 मिनिट बॅटिंग केली. अदानी यांच्या मुद्यावर त्यांनी मोदी सरकारला घेरले. मोदी यांच्या विदेश दौऱ्यात एकच नाव ठळकपणे दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी यांच्यामुळेच अदानी देशातील प्रत्येक क्षेत्रात घुसल्याचा दावा त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर चौफेर टिकास्त्र सोडले. 2014 मध्ये गौतम अदानी हे श्रीमंतांच्या यादीत 609 क्रमांकावर होते. ते नंतर आठच वर्षात अदानी हे दुसऱ्या क्रमांकावर कसे पोहचले? असा सवाल त्यांनी केला. त्यांनी सवाल केला की, अदानी दोन क्रमांकावर कसे पोहचले?

यापूर्वी अदानी यांच्या विमानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास करत होते. त्यानंतर आता अदानी पंतप्रधान मोदी यांच्या विमानातून प्रवास करतात. पंतप्रधानांच्या विदेशी दौऱ्यात अदानी कितीवेळा होते, असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरण आणि हेतूवर शंका उपस्थित केली.

सार्वजनिक क्षेत्रातील बँका, एसबीआय, पीएनबी आणि इतर बँकांनी अदानी यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केले. एलआयसीचा पैसा ही अदानी यांना देण्यात आला. या सर्व श्रृंखलावर त्यांनी बोट ठेवले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.