राजा रघुवंशीच्या हत्येचं पूर्ण सत्य समोर; दरीत फेकला मृतदेह अन् आनंद साजरा करत राहिली सोनम
Raja Raghuvanshi murder case highlights: विशालचा पहिला वार, दरीत फेकला मृतदेह, पतीचा मृत्यू साजरा करत राहिली सोनम; समोर आलं राजा रघुवंशीच्या हत्येचं पूर्ण सत्य

Raja Raghuvanshi murder case highlights: मेघालय त्याचं नैसर्गिक सौंदर्य आणि संस्कृतीमुळे प्रसिद्ध आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मेघालय हत्येमुळे चर्चेत आहे. एक वैवाहिक कपल लग्नाच्या 12 दिवसांनंतर मेघायल याठिकाणी हनीमूनसाठी आलं पण काही दिवसांनंतर दोघेही बेपत्ता झाले. लोकांकडून अनेक तर्क लावले जात असताना धक्कादायक माहिती समोर आली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. कारण पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं सत्य समोर आलं. राजा रघुवंशी आणि सोनम असं कपलचं नाव आहे. आता सोनम हिला पोलिसांनी अटक केली आहे. दरोड्यापासून ते बेशुद्धीशीपर्यंत अनेक कथा रचल्या गेल्या पण सत्य लपवता येत नाही. राजा रघुवंशी हत्याकांडाचं सत्य आता सर्वांसमोर आहे.
या हत्याकांडत राजा रघुवंशी याची पत्नी सोनम मुख्य आरोपी असल्याचं सांगण्यात येत आहे. पची हत्या करण्यासाठी तिने अन्य चार जणांची मदत घेतली. चार जणांनी देखील आरोप कबूल केले आहेत. राज कुशवाह, विशाल, आकाश आणि आनंद अशी चार आरोपींची नावे आहेत.
विशालने केले पहिला वार
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, राजा रघुवंशी याची हत्या करून त्याला खोल दरीमध्ये ठकलण्यात आलं. गुन्हे शाखेचे एसीपी पूनमचंद यादव यांनी सांगितल्यानुसार, पहिला आरोपी विशाल उर्फ विक्की ठाकूर याने हा गुन्हा केला. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितलं, ते इंदूरहून ट्रेनने गुवाहाटी येथे पोहोचले आणि तेथून ते शिलाँगला गेले. इंदूरहून थेट ट्रेन नसल्याने त्यांनी मेघालयात पोहोचण्यासाठी अनेक गाड्या बदलल्या.
यादरम्यान, राज कुशवाह इंदूर येथेच थांबला. पण त्याने विशाल, आकाश आणि आनंद यांनी खर्चासाठी 40-50 हजार रुपये दिले होते. सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, पतीची हत्या होत असताना सोनम तेथेच होती. घडणारी प्रत्येक घटना सोनम स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती. हत्या केल्यानंतर राजाचा मृतदेह खोल दरीत फेकरण्यात आला.
एसीपी क्राइम ब्रांच पूनमचंद यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालने खून करताना घातलेले कपडे त्याच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत. हे रक्त राजाचे आहे की नाही याची खात्री करण्यासाठी ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जातील.
आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आजचा दिवस अत्यंत खास आहे. सोनम रघुवंशी आणि या प्रकरणात अटक केलेल्या चारही आरोपींना शिलाँग न्यायालयात हजर केलं जाईल. हजर होण्यापूर्वी सर्वांची वैद्यकीय चाचणी केली जाईल, त्यानंतर न्यायालयाकडून पोलिस कोठडी मागितली जाईल.
