इशकजादे!! आधी दारु प्यायले, मग एकमेकांच्या डोक्यात गोळ्या घातल्या!

इशकजादे!! आधी दारु प्यायले, मग एकमेकांच्या डोक्यात गोळ्या घातल्या!

राजस्थानमधील बाडमेरच्या एका प्रेमी युगुलाने चित्रपटाची कथा वाटावी अशा नाट्यमयपणे आत्महत्या केली. दोघेही प्रियकर-प्रेयसी शहरापासून एका निर्जन स्थळी आले. तेथे रात्रभर एकमेकांसोबत वेळ घालवत पार्टी केली.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 13, 2019 | 4:26 PM

नवी दिल्ली: प्रेमी युगुलांनी प्रथम एकमेकांसोबत वेळ घालवणे, पार्टी करत दारु पिणे आणि नंतर एकमेकांवर गोळी झाडत आत्महत्या करणे हा घटनाक्रम आपण चित्रपटाच पाहिला असेल. हबीब फैसल दिग्दर्शित हिंदी चित्रपट इशकजादेमध्येही असे कथानक आहे. मात्र, खऱ्या आयुष्यातही असे घडल्याचे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र, राजस्थानमधील बाडमेरच्या एका प्रेमी युगुलाने चित्रपटाची कथा वाटावी अशा नाट्यमयपणे आत्महत्या केली.

दोघेही प्रियकर-प्रेयसी शहरापासून एका निर्जन स्थळी आले. तेथे रात्रभर एकमेकांसोबत वेळ घालवत पार्टी केली. दारुही पिली आणि नंतर एकमेकांवर गोळी झाडली. आत्महत्या करण्याच्या आधीचा प्रत्येक क्षण त्यांनी आपल्या कॅमेरामध्ये टिपला.

पहिल्या फोटोत एक हात दिसत असून त्यात प्रेयसीने आपल्या हातावर मेहंदीने आपल्या प्रियकराचे नाव लिहिले आहे. फोटोतील हाताच्या मागेच एक बीअरची बॉटलही दिसत आहे. त्यावरुन दोघांनीही रात्री दारु पित पार्टी केल्याचे स्पष्ट होते.

दुसऱ्या फोटोत मुलीच्या दोन्ही हातात बंदुक दिसते आहे. तिने एका हाताने आपल्या स्वतःच्या डोक्यावर बंदुक रोखली आणि दुसऱ्या हाताने प्रियकराच्या डोक्यावर बंदुक धरल्याचे दिसत आहे. तसेच प्रियकराचाही एक हात प्रेयसीच्या डोक्यावर धरलेल्या बंदुकीच्या ट्रिगरवर दिसत आहे.

अन्य एका फोटोत युवक आणि युवती दोघे आपल्या हातात बंदुक घेऊन आपआपल्या डोक्यावर बंदुक रोखताना दिसत आहेत.

हे सर्व फोटो पाहता हे प्रेम प्रकरण असल्याचे दिसते. दोघेही घटनास्थळावर भेटले, तेथे पार्टी केली आणि नंतर एकमेकांवर गोळी झाडत आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरुन दोघांचाही मृतदेह ताब्यात घेतला आहे. दोघांच्याही डोक्यावर गोळी झाडल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. मात्र, सध्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येच्या गुन्ह्याची नोंद करुन चौकशी सुरु केली आहे. ही घटना चौहटन पोलीस ठाण्यांतर्गत लीलसर सरहद गावातील आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून याची जोरदार चर्चा सुरु आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें