Rajnikant | रजनीकांत यांचा अखेर राजकारणाला पूर्णविराम; पक्षही विसर्जित

राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाही, असं स्पष्ट करतानाच रजनीकांत यांनी ‘रजनी मक्कल मंद्रम’ (RMM) हा राजकीय पक्ष विसर्जित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. आरएमएमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे. (rajinikanth)

Rajnikant | रजनीकांत यांचा अखेर राजकारणाला पूर्णविराम; पक्षही विसर्जित
Rajinikanth
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 12:42 PM

चेन्नई: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणालाच पूर्णविराम दिला आहे. राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाही, असं स्पष्ट करतानाच रजनीकांत यांनी ‘रजनी मक्कल मंद्रम’ (RMM) हा राजकीय पक्ष विसर्जित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. आरएमएमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे. (Rajinikanth dissolved his political organization RMM, said no plan to return to politics)

‘रजनी मक्कल मंद्रम’ हा संपूर्ण पक्ष विसर्जित करण्यात येत आहे. यापुढे हा पक्ष कार्यरत राहणार नाही, अस्तित्वात राहणार नसल्याचं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. भविष्यात राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही योजना नाही. मी राजकारणात येणार नाही, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. रजनीकांत यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

तामिळनाडूत राजकीय हालचाल सुरू

29 डिसेंबर 2020 रोजी रजनीकांत यांनी राजकारणात येणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजकारणात येण्याबाबत विचार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे तामिळनाडूतील राजकारणात हालचाल सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका न लढण्याचा निर्णयही घेतला. त्यामुळे रजनीकांत राजकारण सोडणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता त्यांनी त्यांच्या राजकारणात येण्याबाबतच्या संभ्रमावर पडदा टाकला आहे.

रजनीकांत यांनी गेल्यावर्षी एक चिठ्ठी लिहून त्यांची भूमिका जाहीर केली होती. मी राजकीय पक्ष सुरू करू शकत नाही, याचा मला खेद आहे. अत्यंत जड अंतकरणाने मी हा निर्णय घेत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी कोरोनाचं कारणही पुढे केलं होतं. मी लोकांना भेटलो आणि कोरोना संक्रमित झालो तर माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही संसर्ग होईल. त्यांनाही संघर्ष करावा लागेल. जीवनातील शांततेसह त्यांचं मोठं आर्थिक नुकसानाही होईल, असं रजनीकांत म्हणाले होते.

सर्वाधिक फॅन्स क्लब

तामिळनाडूतील राजकारणात कोणत्या अभिनेत्याचे किती फॅन्स आहेत हे सुद्धा महत्त्वाचं मानलं जात आहे. हे फॅन्स एकप्रकारे मतदारच असतात आणि राज्यातील राजकारणावर प्रभाव पाडत असतात. तामिळनाडूत कमल हसन यांचे 5,00,000 फॅन्स क्लब आहेत. तर रजनीकांत यांचे केवळ 50,000 फॅन्स क्लब आहेत. त्यामुळे कमल हसन या फॅन्सच्या जोरावर तामिळनाडूचं राजकारण फिरवू शकतात, असंही बोललं जात आहे. कमल हसन यांच्या फॅन्स क्लबला ‘नरपानी इयेक्कम’ म्हटलं जातं. याचा अर्थ चांगल्या कामासाठी आंदोलन करणारे. हसन यांचे फॅन्स क्लब चांगल्या सामाजिक कामावर भर देत असतात, तर रजनीकांत यांचे फॅन्स क्लब रजनीकांत यांची पूजा करण्यावर भर देतात, हा या दोन्ही फॅन्स क्लबमधला मूलभूत फरक आहे. (Rajinikanth dissolved his political organization RMM, said no plan to return to politics)

संबंधित बातम्या:

रजनीकांत यांची राजकारणातून माघार; कमल हसन पोकळी भरून काढणार?; वाचा सविस्तर रिपोर्ट

Rajnikant | सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात नो एन्ट्री! काय आहे कारण?

Special Report | फडणवीस, राऊतांचं ‘मिशन पुणे’; शिवसेना-भाजपची जोरदार तयारी

(Rajinikanth dissolved his political organization RMM, said no plan to return to politics)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.