AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संसदेतील हल्ल्याप्रकरणात मोठी कारवाई…एका दिवसांत काय झाले बदल

Parliament Security Breach: सुरक्षेत आढळलेल्या त्रुटीनंतर संसदेतील प्रवेशांवर निर्बंध लादण्यात आले. यापुढे सगळ्या प्रवेशद्वारांवर बॉडी स्कॅनर बसवले जाणार आहे. या प्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर पाऊल उचलले आहे. आठ जणांना निलंबित केले आहे.

संसदेतील हल्ल्याप्रकरणात मोठी कारवाई...एका दिवसांत काय झाले बदल
rajnath singh
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 14, 2023 | 11:55 AM
Share

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली 14 डिसेंबर | बुधवारी संसदेत झालेल्या हल्ला प्रकरणात एकीकडे आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. दुसरीकडे या हल्ल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेत उमटले. यानंतर गुरुवारी संसदेत प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया बदलण्यात आली. गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत उत्तर दिले. राजनाथ सिंह यांनी सांगितले की, आम्ही सर्व खासदारांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्यांना आम्ही पास देतो त्याबाबत काळजी घ्यायला हवी. संसदेच्या सभागृहात विरोधकांनी अराजकता निर्माण करणे योग्य नाही. काल जो प्रकार झाला तो दुर्देवी आहे. या प्रकरणी लोकसभा सचिवालयातील आठ जणांना निलंबित करण्यात आले.

लोकसभा अध्यक्ष करणार चर्चा

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, बुधवारच्या घटनेनंतर आम्ही सर्वच जण चिंतेत आहोत. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्या सचिवालयाची आहे. लोकसभा सचिवालय पुन्हा सर्व खासदारांशी चर्चा करणार आहे.

संसद घुसखोरी प्रकरणानंतर निर्बंध

सुरक्षेत आढळलेल्या त्रुटीनंतर संसदेतील प्रवेशांवर निर्बंध लादण्यात आले. यापुढे सगळ्या प्रवेशद्वारांवर बॉडी स्कॅनर बसवले जाणार आहे. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. लोकसभा सचिवालयाने गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवांना पत्र लिहून निर्देश दिले आहेत. तसेच संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल केले जाणार आहे. आता खासदारांच्या पीएना ही संसदेत प्रवेश दिला जाणार नाही.

भाजप अन् काँग्रेसची बैठक

संसदेच्या कामकाजापूर्वी सत्ताधारी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. एकीकडे इंडिया आघाडीची बैठक होत असतानाच सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षांची बैठक झाली. बैठकीत संसदेमधील बुधवारी झालेल्या प्रकरणावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तसेच या प्रकरणात काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक झाली. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यानंतर इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहे. या प्रकरणान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?