AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊनं तर क्रिकेट टीमच केली तयार, 17 व्या मुलाच्या जन्मानंतर म्हणाला मी तर अत्यंत गरीब, राहण्यासाठी सुद्धा घर नाही

Trible Couple : या भाऊचा उत्साह काही कमी झालेला नाही. त्याने सरकारच्या कुटुंब नियोजनाचे पार काडंकं वाजवलं. त्याच्या 55 वर्षाच्या पत्नीला आता 17 वं बाळ झालं आहे. तर पतीचा दावा ऐकून यंत्रणा कोमात गेल्या आहेत.

भाऊनं तर क्रिकेट टीमच केली तयार, 17 व्या मुलाच्या जन्मानंतर म्हणाला मी तर अत्यंत गरीब, राहण्यासाठी सुद्धा घर नाही
| Updated on: Aug 27, 2025 | 3:30 PM
Share

तर या दाम्पत्याला आता 17 वं बाळ झालं आहे. 55 वर्षाच्या पत्नीला हे बाळ झालं. त्यावेळी त्याचे नातू सुद्धा बाळ पाहायला आले होते. या व्यक्तीनं आरोग्य यंत्रणांची झोप उडवली आहे. त्यानं सरकारच्या कुटुंब नियोजनाचं पार खोबरं करून टाकलं. आपण अत्यंत गरीब असून आपल्या डोक्यावर साध छत सुद्धा नसल्याच्या या इसमाच्या दाव्याने यंत्रणा कोमात गेल्या आहेत. अर्थात गरिबीचा आणि अपत्य होण्याचा तसा अर्थाअर्थी संबंध नाही. पण आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा, त्याची हौसमौज करण्याचा प्रत्येक पालकाचा प्रयत्न असतो. त्यातच आता हम दो हमारे दो वर अनेक जण थांबतात. त्याला ही व्यक्ती अपवाद ठरली आहे.

दाम्पत्याच्या संसार वेलीवर 17 वे फुल

राजस्थानमधील उदयपूर येथील आदिवासी बहुल अंचल झाडोल या भागात हा प्रकार समोर आला आहे. सरकारच्या संतती नियमन आणि कुटुंब नियोजन दाव्याचा फोलपणा या घटनेने उघड केला. तर स्त्री म्हणजे मुलं पैदा करण्याची मशीन नाही या विचाराला ही येथे काही अर्थ उरलेला नसल्याची टीका होत आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रात 55 वर्षांच्या रेखा कालबेलिया यांनी 17 व्या बाळाला जन्म दिला. यापूर्वी त्यांनी 16 मुलांना जन्म दिला आहे. त्यांचे 4 मुलगे आणि एक मुलगी जन्मानंतर वारलीत. तर त्यांच्या 5 मुलांचे लग्न झाले असून त्यांना सुद्धा मुलं आहेत.

कुटुंबाकडे राहण्यासाठी नाही घर

सर्वजनिक आरोग्य केंद्रात त्यांच्या या वयात आई होण्याचे अप्रुप अनेक स्त्रीयांना सुद्धा होते. रेखा यांचे पती कवरा कालबेलिया यांनी सांगितले की, त्यांच्याकडे स्वतःचे घर नाही. ते अत्यंत हालाकीचं जीवन जगत आहेत. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्यांनी सावकाराकडून 20 टक्के व्याजदराने कर्ज घेतले आहे. त्यांनी त्यापोटी एक लाख रुपये चुकते केले आहे. पण कर्जाचा बोजा काही कमी झालेला नाही.

कवरा हे भंगार जमा करतात आणि त्याची विक्री करतात. त्यांना शिक्षणाचा गंध नाही. त्यांनी कधी मुलांनाही शाळेत पाठवलं नाही. त्यांच्या नावावर जमीन नाही. त्यामुळे पीएम आवास योजनेचा त्यांना फायदा घेता आला नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या दाव्याने यंत्रणेला झटका बसला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, आदिवासींमध्ये कुटुंब नियोजनाविषयीची जागरुकता झालेली नाही. तर काहींनी हा शिक्षणाचा अभाव असल्याचे म्हटले आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा