हा तर सापांचा बाप; सुईपेक्षाही पातळ दात, चावला तरी नाही जाणवणार, क्षणात माणसाचा गेमच होणार
Walls Karait Snake : हा साप क्रेटपेक्षा पण विषारी मानला जातो. हा अंधारात भक्ष्याची शिकार करतो. तो चपळाईने हल्ला करतो. तो चावल्यानंतर त्याची जाणीव सुद्धा होत नाही. त्यामुळे माणसाला वाचण्याची काहीच संधी मिळत नाही. कोणता आहे तो साप?

एका दुर्मिळ सापाच्या प्रजातीविषयी काही संशोधकांनाच माहिती आहे. कारण हा साप शक्यतोवर मानवी वस्त्यांकडे भटकत नाही. पण शेतात आणि झाडीझुडपात दडलेला असतो. क्रेट या विषारी सापापेक्षा पण तो खतरनाक आहे. ही क्रेटमधीलच सापाची एक जात आहे. उत्तर भारतात क्रेटच्या तीन प्रजाती आढळतात. हा साप रात्री त्याची शिकार शोधतो. तो इतका चपळाईने चावा घेतो की, त्याची जाणीव सुद्धा लवकर होत नाही. पण ज्यावेळी त्याची जाणीव होते, तेव्हा वेळ कमी उरते आणि मृत्यू ओढावतो.
वॉल्स क्रेटची दहशत
वॉल्स क्रेट हा दुर्मिळ साप आहे. त्याचे इतर जातभाई उत्तर भारतात सापडतात. या गटातील दोन प्रजाती या शेतात, मानवी वस्तींच्या जवळपास अनेकदा दिसून आल्या आहेत. पण वॉल्स क्रेट हा त्यांच्यापेक्षा अधिक विषारी आहे. तो जंगलात अधिक रमतो. पण कधी कधी मानवी वस्ती अथवा शेतात भक्षाच्या शिकारीसाठी तो येतो. या वॉल्स क्रेटची पहिली नोंद 1907 साली झाली होती. कर्नल फ्रँक वॉल्स यांनी उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे या या सापाचे तीन अवशेष मिळाले. त्याची त्यांनी नोंद केली. त्याच्या या शोधामुळे त्यांचे नाव या सापाला देण्यात आले. तेव्हापासून सापाचे अभ्यासक या प्रजातीला वॉल्स क्रेट असे म्हणतात. हा साप दुर्मिळ मानल्या जातो.
सुईपेक्षा पण पतले दात
वॉल्स क्रेटचे दात सुईपेक्षा पण पतले असतात. तो चावला तर त्याची जाणीव सुद्धा होत नाही. तो चपळाईने हल्ला करतो. त्यामुळे चालताना तो चावला तरी त्याची जाणीव होत नाही. न्यूरोटॉक्सिक विषामुळे मनुष्याचा अगदी काही मिनिटातच मृत्यू होतो. त्यामुळे हा साप सर्वात घातक मानल्या जातो. हा साप दिवसा सहजासहजी नजरेस पडत नाही. हा साप रात्री शिकारीसाठी बाहेर पडतो.
तसा या सापामुळे मानवीय मृत्याच्या घटनांची नोंद नसल्यात जमा आहे. पण तरीही तो घातक मानल्या जातो. हा साप डोंगरात उंच ठिकाणी अथवा मैदानी भागात आढळतो. सर्पमित्र त्याच्याविषयी विशेष जागरूक असतात. तो सहजा सहजी दिसत नसल्याने वॉल्स क्रेट सापडला तर त्याची तात्काळ नोंद घेऊन त्याची माहिती दिली जाते. त्यामुळे रात्री शेतात अथवा अडवळणी फिरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ करतात.
