AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“रक्षा का बंधन”, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सचा टीव्ही 9 नेटवर्कच्या सहकार्याने खास उपक्रम

यंदाच्या रक्षाबंधनाला टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्सने टीव्ही9 नेटवर्कच्या मदतीने "रक्षा का बंधन" या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रक्षा का बंधन, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सचा टीव्ही 9 नेटवर्कच्या सहकार्याने खास उपक्रम
Raksha ka bandhan
| Updated on: Sep 01, 2025 | 8:11 PM
Share

यंदाच्या रक्षाबंधनाला टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्सने टीव्ही9 नेटवर्कच्या मदतीने एका खास उपक्रमाद्वारे नातेसंबंधांचे भावनिक उदाहरण सादर केले. “रक्षा का बंधन” असे या अनोख्या उपक्रमाचे नाव होते. टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्सच्या जमशेदपूर प्लांटमधील दुर्गा लाईनमधील महिलांनी ट्रक चालकांसाठी खास राख्या बनवल्या. या राख्या भारताला गतिमान ठेवणाऱ्या चालकांबद्दल प्रेम आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे.

दुर्गा लाईनमधील महिलांना सुरक्षा किती महत्नाची आहे हे चांगलेच माहिती आहे. कारण या महिला क्रॅश-टेस्टेड केबिन आणि ADAS (अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स) सारख्या आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या सुरक्षित ट्रक तयार करण्यात महत्वाचे योगदान देत आहेत. या महिलांसाठी ट्रक केवळ एक मशीन नाही, तर जीवन आणि उपजीविकेची सुविधा आहे. देशातील प्रत्येक ड्रायव्हर या महिलांसाठी कुटुंबासारखा आहे. या राख्या फक्त धागे नाहीत, तर त्यांच्या हृदयातून ड्रायव्हर्ससाठी निघालेली प्रार्थना आहे.

जमशेदपूरमधील या राख्या अनेक राज्ये ओलांडून नवी मुंबईतील कळंबोली ट्रान्सपोर्ट नगरमध्ये पोहोचल्या. या राख्या येथील ट्रक चालकांना प्रेमाने बांधण्यात आल्या. हायवे आणि गावांमधून चालक थकवणारा प्रवास करतात. या राख्यांमागे त्यांचा मेहनत त्यांचे कष्ट समजून घेण्याचा आणि त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न होता.

टीव्ही 9 नेटवर्कसोबतच्या पार्टनरशीपमुळे हा उपक्रम आणखी खास बनला. टीव्ही 9 ने या उपक्रमाच्या प्रत्येक भागाचा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपला. राख्या बनवणाऱ्या महिलांचे भावनिक संदेश आणि चालकांच्या मनगटावर या राख्या बांधतानाची दृष्ये कॅमेऱ्यात कैद झाली. या उपक्रमाचे व्हिडिओ टीव्ही 9 च्या प्रमुख प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले गेले, त्यामुळे हा एक उपक्रम राष्ट्रीय उत्सव बनला.

जेव्हा नाती हृदयापासून निभावली जातात तेव्हा सुरक्षेची भावनाही हृदयातून येते

“रक्षा का बंधन” या खास मोहिमेद्वारे, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्सने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की “Safety with Care” हा कंपनीचा विचार केवळ तांत्रिक नवोपक्रमापुरते मर्यादित नाही, तर त्यात मानवी नाती निर्माण करण्याची कला देखील आहे. यामुळे विश्वास मजबूत करणारे संबंध तयार झाले आहे. यामुळे सुरक्षेचे कवच आणखी मजबूत झाले आहे.

या मोहिमेद्वारे, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स भारताला पुढे नेणाऱ्या ट्रक चालकांना सलाम करते. वाहनाच्या प्रत्येक कोपऱ्यात आवश्यक असलेल्या वस्तू दिल्या जातात. यामुळे चालकांना असे वाटते की, त्यांचा प्रवास महत्त्वाचा आहे, त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि त्यांचे नातेसंबंधही महत्त्वाचे आहेत.

टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्स – ऑलवेज बेटर.

दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.