AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : चार दिवसातच रामलल्ला झाले करोडपती, आतापर्यंत इतक्या कोटींचं दान

Ram Mandir donation : राम मंदिरात भाविकाचं येण्याचा ओघ सुरुच आहे. दररोज लाखो भाविक दर्शनासाठी राम मंदिरात येत आहेत. कडाक्याच्या थंडीत देखील भाविक रांगा लावूवन दर्शन घेत आहेत. भाविकांकडून रामलल्लाचा मोठ्या प्रमाणात देणगी येत आहे. राम मंदिरात ४ दिवसात मोठं दान आले आहे.

Ram Mandir : चार दिवसातच रामलल्ला झाले करोडपती, आतापर्यंत इतक्या कोटींचं दान
| Updated on: Jan 27, 2024 | 8:03 PM
Share

अयोध्या : भव्य राम मंदिर पाहण्यासाठी आणि रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी दररोज भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. जितक्या मोठ्या संख्येने भाविक येत आहे तितक्याच संख्येने ते मंदिरासाठी दान देखील करत आहेत. रामभक्तांनी रामललावर पैशांचा वर्षाव केलाय. राम मंदिरासाठी फक्त देशातूनच नव्हे तर परदेशातूनही देणग्या येत आहेत. आतापर्यंत कोट्यवधींचं दान जमा झाले आहे.

रामभक्त रामललाच्या दरबारात मोठ्या भक्तिभावाने दान करताना दिसत आहेत. ऑनलाइन असो की  ऑफलाइन दोन्ही माध्यमातून राम मंदिरासाठी देणगी येत आहे. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर अनेक जण देणग्या जमा करत आहेत. पहिल्या दिवशी राम मंदिरात 2 कोटी 90 लाखाचे दान आले. त्यानंतर 24 जानेवारीला 2 कोटी 43 लाख रुपये, 25 जानेवारीला 8 लाख 50 हजार रुपये आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी 1 कोटी 15 लाख रुपयांची देणगी आली आहे.

४ दिवसात किती देणगी

23 जानेवारी 2 कोटी 90 लाख रुपये 24 जानेवारी 2 कोटी 43 लाख रुपये 25 जानेवारी 8 लाख 50 हजार रुपये 26 जानेवारी 1 कोटी 15 लाख रुपये

लाखो भाविकांनी घेतले दर्शन

रामलल्लाचे २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरराम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. तेव्हापासून भक्तांचा ओघ सुरुच आहे, दररोज लाखो भाविक दर्शनसाठी येत आहेत. सकाळपासूनच रामपथ आणि मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागत आहेत. कडाक्याची थंडी असताना ही लोक मंदिराबाहेर रांगेत उभे आहेत. ‘जय श्री राम’चा नारा देत भाविक दर्शनासाठी तासनतास उभे आहेत.  27 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 75 हजार राम भक्तांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे.

भाविकांची वाढती गर्दी पाहता पहिल्याच दिवसापासून राम मंदिरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लोकांची गर्दी लक्षात घेता रॅपिड अॅक्शन फोर्स आणि एटीएसचे जवीन तैनात करण्यात आले आहे. प्रशासनाकडून भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जात आहे. अयोध्येला राम मंदिरामुळे वेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे. फक्त देशातूनच नव्हे तर परदेशातून देखील भाविक दर्शनासाठी अयोध्येला पोहोचत आहेत.

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.