Ram Mandir : राम मंदिर निर्माणातून सरकारच्या खजिन्यात जमा होणार 400 कोटी रुपये – चंपत राय
Ram Mandir : "मंदिरासाठी लागलेले दगड आणि लाकडाचे पैसे चुकवण्यात आले. मंदिर निर्माणासाठी राजस्थानातून खास दगड मागवण्यात आले होते. महाराष्ट्रातून लाकूड मागवण्यात आलं होतं. वेगवेगळी राज्य, शहरातून मंदिर निर्माणासाठी लागणार साहित्य मागवण्यात आलं होतं"
राम मंदिर निर्माणासाठी लागणाऱ्या सामग्री संदर्भात श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी एक वक्तव्य केलय. मंदिर निर्माणासाठी लागलेल्या प्रत्येक साहित्याचे आम्ही पैसे दिले आहेत. त्यातून सरकारला 400 कोटी रुपयांचा जीएसटी मिळणार आहे. मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये आयोजित समारंभात चंपत यांनी ही माहिती दिली. यावर्षी उत्तर प्रदेशच्या अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराच उद्घाटन झालं.
इंदूरमध्ये एका कार्यक्रमात राम मंदिर जन्मभूमि तीर्थ ट्रस्ट क्षेत्रचे सरचिटणीस चंपत राय यांनी मंदिर निर्माणावर झालेल्या खर्चाबाबत विधान केलं. आम्ही मंदिरासाठी लागणाऱ्या प्रत्येक एका साहित्याचे पैसे दिले आहेत. आम्ही राम मंदिर निर्माणासाठी संपूर्ण देशभरात 42 दिवस समर्पण निधी अभियान चालवलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
42 दिवसात किती निधी जमा झाला?
“42 दिवसाच्या या समर्पण अभियानात देशातील 10 कोटी लोकांनी प्रभू श्रीरामांबद्दल आस्था दाखवत मंदिर निर्माणासाठी पैसे दिले. 42 दिवसात लोकांनी 2800 कोटी रुपयाच दान दिलं. सरकारने सुद्धा सहकार्य केलं” असं चंपत राय म्हणाले. “लोकांनी जे पैसे दिले, त्यातून मंदिर निर्माणासाठी लागणार साहित्य आणलं. त्यातून सरकारला जीएसटीच्या रुपातून कोट्यवधी रुपये मिळाले” असं ते म्हणाले.
राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून काय साहित्य मागवलेलं?
“मंदिरासाठी लागलेले दगड आणि लाकडाचे पैसे चुकवण्यात आले. मंदिर निर्माणासाठी राजस्थानातून खास दगड मागवण्यात आले होते. महाराष्ट्रातून लाकूड मागवण्यात आलं होतं. वेगवेगळी राज्य, शहरातून मंदिर निर्माणासाठी लागणार साहित्य मागवण्यात आलं होतं” असं चंपत राय म्हणाले.