AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिर ट्रस्ट अडचणीत? कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज राजीनामा देणार का? महत्वाची अपडेट समोर

govind giri maharaj : राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांनी पदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना गोविंद गिरी महाराज यांनी भूमिका स्पष्ट केली.

राम मंदिर ट्रस्ट अडचणीत? कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज राजीनामा देणार का? महत्वाची अपडेट समोर
| Updated on: Jul 14, 2026 | 12:00 PM
Share

देशात राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टाने ट्रस्टला नोटीस पाठवली आहे. सुप्रीम कोर्टाने ट्रस्टला एसआयटीला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे मंदिरातील देणगी चोरी प्रकरणानंतर ट्रस्टमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ट्रस्टमध्ये नोटा मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला. त्यानंतर राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू होती. परंतु गोविंदगिरी महाराजांनी पत्रकार परिषद घेऊन कोषाध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले.

कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत गोविंदगिरी महाराज म्हणाले, ‘ माझ्याविषयी एक बातमी पसरवली. मी कोषाध्यक्ष राजीनामा देणार असल्याचा विचारात आहे, अशी बातमी पसरवली गेली. परंतु मी कधीच असं म्हणणार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे. मैदान सोडून पळणार नाही. सर्व समस्या सोडवू. मी 1993 सालापासून अपार्टमेंटमध्ये राहत आहे. या अपार्टमेंटमध्ये 10 फ्लॅट आहेत. 10 पैकी एका फ्लॅटमध्ये मी राहतो. तीन फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या ट्रस्टची ऑफिस आहे. एकात किचन आहे. आमच्या संस्थेचे 5 फ्लॅट आहेत. यातील काहीही माझ्या नावावर नाही.

‘माझ्या नावावर एक वीट देखील नाही. फक्त एक बँक खाते नावावर आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या नावावर काही नाही. माझ्या नावावर कोणतीही संपत्ती नाही. कधीच नव्हती. परंतु माझ्याविषयी चुकीची बातमी पसरवली. कोषाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे कधीही बोललो नाही. त्याचे स्पष्टीकरण वेळेवर दिले पाहिजे. मला अनेकांचे फोन आले. मी राम मंदिर ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज पुढे म्हणाले, ‘संघर्षावेळी ट्रस्ट सोबत उभा राहणं महत्वाचं आहे. SIT च्या चौकशीवर मी समाधानी आहे. चंपातराय यांनी जो राजीनामा दिला आहे. तो त्यांचा हलगर्जीपणामुळे दिलेला आहे. त्यांनी दिलेला राजीनामा हा स्व:च्छेने दिलेला आहे. जमाखर्चाची जबाबदारी मी स्वीकारत आहे. मी कुठं प्रभाव टाकत नाही. कुणाला ही फोन केलेला नाही. गुन्हेगार कुणीही असो, त्यांना पकडले पाहिजे आणि कठोर कारवाई केली पाहिजे. SBI बँकेने त्यांचे निरीक्षक ठेवायला हवे होते. त्यांनी शिस्त पाळायला हवी होती’.

‘सीसीटीव्हीच्या निगराणीत देणगीची रक्कम मोजली जायची. पण, बाजूला जाऊन ही रक्कम लंपास करण्यात आली. अव्वाच्या सव्वा आकडेवारी सांगितली जात आहे. 3 कोटींच्या आसपास रक्कम असावी, हा माझा अंदाज आहे. हिशोबाच्या तपासणी योग्यच सुरू आहे. चंपातराय यांनी अनिल मिश्रा यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. माझी यात भूमिका नाही. निधी चोरीचा राजकीय संबंध नाही, त्या केवळ गप्पा आहेत. SIT ची चौकशी करत आहे, त्यामुळे त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाहीत., असे त्यांनी जाहीर केले.

Follow Us
थेट "भावी कॅबिनेट मंत्री..." बीडमधील मुंडेंच्या बॅनर्सची जोरदार चर्चा,
Dhananjay Munde | थेट
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदार थेट दिल्लीत...
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदारांना थेट दिल्लीत... अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड
Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...