गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा : रामदास आठवले

जो खासदार आपली जागा सोडून मर्यादेबाहेर वर्तन करून गोंधळ घालत संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल, अशा गोंधळी खासदारांना 2 वर्षांसाठी निलंबित करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केलीय.

गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा : रामदास आठवले
रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 29, 2021 | 6:41 PM

नवी दिल्ली : “केंद्र सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. फोन टॅपिंगची गरज नाही. पेगॅसिस बाबतचा केंद्र सरकारवरील आरोप बिनबुडाचा आहे. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, विरोधक चर्चा न करता संसदेत गोंधळ घालत आहेत. त्यामुळे सलग 3 दिवस गोंधळ घातल्यानंतर चौथ्या दिवशीही जो खासदार आपली जागा सोडून मर्यादेबाहेर वर्तन करून गोंधळ घालत संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल, अशा गोंधळी खासदारांना 2 वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम सरकारने बनवावा,” अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय.

“संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराला 2 वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम बनवावा”

रामदास आठवले म्हणाले, “कोणत्याही विषयावर संसदेत चर्चा व्हावी. एका मर्यादेपर्यंत विरोध प्रदर्शन व्हावे. मात्र, विरोधासाठी संसदेचे कामकाज रोखणे अत्यंत चूक आहे. सलग 3 दिवसांपर्यंत गोंधळ घालून संसदेतील कामकाज रोखणे चूक आहे. यामुळे संसदेचा बहुमोल वेळ वाया जातो. त्यातून देशाचे नुकसान होते. त्यामुळे सलग 3 दिवस गोंधळ घातल्यानंतरही जो खासदार चौथ्या दिवशी संसदेत गोंधळ घालेल त्याला 2 वर्षांसाठी निलंबित करावे. सरकार पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा खासदार असो सर्व खासदारांसाठी हा नियम बनवावा.”

“महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प उभरण्याची अमित शाहांकडे प्रयत्न करु”

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प उभरण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीला रामदास आठवले यांनी पाठिंबा दिलाय. तसेच त्यासाठीचा प्रस्ताव आल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे प्रयत्न करू, असं आश्वासन आठवले यांनी दिलं.

“विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही, 2024 मध्येही मोदीच”

“आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खेळा नाही, तर मोदींच्या समर्थनाचा मेळा होणार आहे. 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार निवडून येईल. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही. त्यामुळे मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही,” असे रामदास आठवले यांनी सांगितलं.

हेही वाचा :

‘पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं, सामनातून केंद्रावर टीका

“हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेलं, देश सुरक्षित असल्याचं लक्षण नाही”

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा : नाना पटोले

व्हिडीओ पाहा :

Ramdas Athawale demand to suspend MPs doing chaos in parliament

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें