AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही आरक्षण सोडण्यास तयार, फक्त…; मोदी सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान

आम्ही आरक्षण सोडण्यास तयार असल्याचे मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी केलं. रामदास आठवले यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

आम्ही आरक्षण सोडण्यास तयार, फक्त...; मोदी सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान
ramdas athawle newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 12:38 PM
Share

देशातील आरक्षण हटवण्याची मागणी काही संघटनाकडून केली जात आहे.  देशातील काही संघटनांनी जंतर-मंतरवर आंदोल केलं. त्यामुळे आरक्षण हटवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावर मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी मोठं भाष्य केलं आहे. तसेच आरक्षण सोडण्यासाठी एक अट देखील ठेवली आहे. ही अट पूर्ण केल्यानंतर आरक्षण सोडण्यास तयार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय रामदास आठवले हे छत्तीसगडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आरक्षणावर मोठं भाष्य केलं. आठवलेंनी म्हटलं की, भारतात जातीवर आधारित आरक्षणाची तरतूद आहे. जोपर्यंत जातीयवाद राहील, तोपर्यंत आरक्षण कायम राहील, असा दावा त्यांनी आधी केला होता. त्यानंतर आता रांचीमध्ये म्हटलं की, जाती व्यवस्था संपुष्टात आली, तर आम्ही आरक्षण सोडण्यास तयार आहे’. तर जातीवर आधारित आरक्षणाच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन झालं. यावेळी पोलिसांनी 50 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. गरिब विद्यार्थ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आंदोलकांची मागणी होती. सोशल मीडियावरही आरक्षण हटवण्याची मागणी काही तरुणांकडून केली जात आहे.

पाटणामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आंदोलन 

आरक्षणाच्या मुद्यावरून मंगळवारी मोठ्या संख्येने अनुसूचित जाती आणि ओबीसी तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारने 65 टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली. बिहारमध्ये सध्या आरक्षण 50 टक्क्यांवर आहे. 2024 साली पटनामध्ये 65 टक्के आरक्षण घटनाबाह्य घोषित करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारने आरक्षणाची मर्यादा ही 65 टक्के केली होती. 2022-23 च्या जाती आधारित सर्व्हेच्या रिपोर्टवर आधावर निर्णय घेण्यात आला होता. परंतु या आरक्षणाला पाटणा हायकोर्टाने ब्रेक लावला होता. हायकोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला होता.

काही दिवसांपूर्वी जंतर-मंतरवर आरक्षणाच्या सुधारणा आणण्यासाठी आंदोलन झालं होतं. या आंदोलनातील प्रमुख नेत्यांची भेट ही केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी घेतली होती. यां आंदोलनात हर्ष दुबे, मृत्यूजंय पाठक, रण बहादूर सिंह चौहान यांनी सहभाग दर्शवला होता. त्यांच्यासोबत लवकरच केंद्रीय मंत्र्‍याने आणखी एक बैठक करू असं आश्वासन दिलं होतं.

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत