VIDEO : भर संसदेत रामदास आठवलेंची गुलाम नबी आझाद यांना ऑफर, आख्खं राज्यसभा खळखळून हासलं

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या काव्यमय स्टाईलने गुलाम नबी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या (Ramdas Athawale offer to ghulam nabi azad)

VIDEO : भर संसदेत रामदास आठवलेंची गुलाम नबी आझाद यांना ऑफर, आख्खं राज्यसभा खळखळून हासलं
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 4:39 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आज राज्यसभेतून निवृत्त झाले. राज्यसभेत त्यांना निरोप देताना अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या काव्यमय स्टाईलने गुलाम नबी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी गुलाम नबी यांना पुन्हा राज्यसभेत यायची विनंती केली. याशिवाय जर काँग्रेस राज्यसभेला पाठवत नसेल तर एनडीएत येण्याचं आमंत्रण रामदास आठवले यांनी गुलाम नबी यांना दिलं (Ramdas Athawale offer to ghulam nabi azad).

“तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. तुम्ही माणूस म्हणून खूप मोठ्या मनाचे आहात. तुम्ही पुन्हा राज्यसभेत यायला हवं. जर काँग्रेस पक्ष तुम्हाला परत संसदेत पाठवणार नाही तर आम्ही तुम्हाला संसदेत आणू. इथे यायला काही अडचण नाही. मी तिकडे होतो. पण इकडे येऊन गेलो. मला काही अडचण आली नाही तर तुम्हाला काय अडचण आहे?”, असं रामदार आठवले म्हणाले. रामदास आठवलेंच्या हे बोल एकूण संसदेत एकच हशा पिकला. त्यापुढे रामदास आठवले आझाद यांना म्हणाले, “तुम्ही पुन्हा संसदेत यावं, हीच आमची अपेक्षा आहे. मी आरपीआयकडून हार्दिक शुभेच्छा देतो”.

रामदास आठवलेंची कविता

राज्यसभेत रामदास आठवले यावेळी कविता म्हणाले. यावेळी अनेकांनी त्यांच्या कवितेला दाद दिली (Ramdas Athawale offer to ghulam nabi azad).

राज्यसभा छोडके जा रहे गुलाम नबी, हम मिलते रहेंगे कभीकभी आपका नाम है गुलाम, इसलिए मै करता हुँ आपको सलाम

आपका नाम है गुलाम, लेकीन आप हमेशा रहे आझाद आप हम सभी को रहेंगे याद,

15 ऑगस्ट को भारत हुआ आझाद, राज्यसभा से आज आप हो रहे आझाद, आप हमेशा रहो आझाद, हम रहेंगे आप के साथ, ये अंदर की है बात!

मोदीची जम्मू-काश्मीर का मजबूत करेंगे हात, और आपको देते रहेंगे साथ

गुलाम नबी भाषण करताना गहिवरले

काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा आज राज्यसभेतला शेवटचा दिवस होता. ते राज्यसभेत गेल्या सहा वर्षांपासून विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका निभावत होते. या कालखंडात त्यांच्या राजकीय आयुष्यात बरेच उतार-चढाव आले. मात्र, त्यांचा आक्रमकपणा कायम लक्षात राहील असाच आहे. राज्यसभेत निवृत्त होत असताना त्यांनी आज शेवटचं भाषण केलं. यावेळी ते भावूक झाले. त्यांच्या या भाषणावेळी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.

“मी त्या भाग्यशाली लोकांपैकी एक आहे जे पाकिस्तान कधीच गेले नाहीत. जेव्हा मी तिथली परिस्थिती वाचतो, तेव्हा मला प्रचंड वाईट वाटतं. याशिवाय मला अभिमान वाटतो की, मी एक हिंदुस्तानी मुसलमान आहे. जगभरात जर कोणत्या मुसलमानांचा गौरव व्हायला हवा तर तो हिंदुस्तानच्या मुसलमानांचा व्हायला हवा”, असं गुलाम नबी म्हणाले.

“मी महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु आणि मौलाना आझाद यांच्याकडे बघून देशभक्ती शिकलो आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचा खरंच खूप आभारी आहे. कारण त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो”, असं आझाद म्हणाले.

“काश्मीरची परिस्थिती आधी वेगळी होती. मात्र, आता वेगळी आहे. हळूहळू बदल होत गेला. मी काश्मीरमधील सर्वात मोठ्या आणि नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. तिथे 14 आणि 15 ऑगस्ट हे दोन्ही दिवस साजरी केले जात होते. मात्र 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या जास्त होती. मी आणि माझे काही जोडीदार 15 ऑगस्ट साजरी करायचो. त्यावेळी भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्यांची संख्या फार कमी होती. कॉलेजमध्ये 15 ऑगस्ट साजरी केल्यानंतर आम्ही एक आठवडा कॉलेजला जायचो नाही. कारण दुसऱ्या दिवशी गेलो तर मार खावा लागला असता. त्या दिवसांच्या संघर्षांपासून आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे”, असं गुलाम नबी यांनी सांगितलं.

“माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात काम करताना चांगलं सहकार्य लाभलं. वाजपेयी यांच्यामुळे संसदेत उत्साहाचं वातावरण असायचं”, अशी आठवण त्यांनी सांगितलं (Ghulam Nabi Azad last speech of Rajya Sabha).

“गेल्या 30-35 वर्षांत अफगाणिस्तानपासून इराणपर्यंत , गेल्या काही वर्षात मुस्लिम देश एकमेकांविरोधात लढाई करत संपत आहेत. तिथे कुणी हिंदू किंवा ख्रिस्ती नाही. ते आपसातच लढत आहेत. पाकिस्तानच्या समाजात ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या आपल्या भारताच्या मुस्लिम समाजात कधीच येऊ नये”, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.