AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : राज्यसभेच्या शेवटच्या भाषणात गुलाम नबी गहिवरले, राज्यसभेत शांतता, आझाद फक्त बोलत राहीले

काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा आज राज्यसभेतला शेवटचा दिवस होता (Ghulam Nabi Azad last speech of Rajya Sabha)

VIDEO : राज्यसभेच्या शेवटच्या भाषणात गुलाम नबी गहिवरले, राज्यसभेत शांतता, आझाद फक्त बोलत राहीले
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 09, 2021 | 3:31 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा आज राज्यसभेतला शेवटचा दिवस होता. ते राज्यसभेत गेल्या सहा वर्षांपासून विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका निभावत होते. या कालखंडात त्यांच्या राजकीय आयुष्यात बरेच उतार-चढाव आले. मात्र, त्यांचा आक्रमकपणा कायम लक्षात राहील असाच आहे. राज्यसभेत निवृत्त होत असताना त्यांनी आज शेवटचं भाषण केलं. यावेळी ते भावूक झाले. त्यांच्या या भाषणावेळी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते (Ghulam Nabi Azad last speech of Rajya Sabha).

गुलाम नबी नेमकं काय म्हणाले?

“मी त्या भाग्यशाली लोकांपैकी एक आहे जे पाकिस्तान कधीच गेले नाहीत. जेव्हा मी तिथली परिस्थिती वाचतो, तेव्हा मला प्रचंड वाईट वाटतं. याशिवाय मला अभिमान वाटतो की, मी एक हिंदुस्तानी मुसलमान आहे. जगभरात जर कोणत्या मुसलमानांचा गौरव व्हायला हवा तर तो हिंदुस्तानच्या मुसलमानांचा व्हायला हवा”, असं गुलाम नबी म्हणाले.

“मी महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु आणि मौलाना आझाद यांच्याकडे बघून देशभक्ती शिकलो आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचा खरंच खूप आभारी आहे. कारण त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो”, असं आझाद म्हणाले.

“काश्मीरची परिस्थिती आधी वेगळी होती. मात्र, आता वेगळी आहे. हळूहळू बदल होत गेला. मी काश्मीरमधील सर्वात मोठ्या आणि नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. तिथे 14 आणि 15 ऑगस्ट हे दोन्ही दिवस साजरी केले जात होते. मात्र 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या जास्त होती. मी आणि माझे काही जोडीदार 15 ऑगस्ट साजरी करायचो. त्यावेळी भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्यांची संख्या फार कमी होती. कॉलेजमध्ये 15 ऑगस्ट साजरी केल्यानंतर आम्ही एक आठवडा कॉलेजला जायचो नाही. कारण दुसऱ्या दिवशी गेलो तर मार खावा लागला असता. त्या दिवसांच्या संघर्षांपासून आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे”, असं गुलाम नबी यांनी सांगितलं.

“माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात काम करताना चांगलं सहकार्य लाभलं. वाजपेयी यांच्यामुळे संसदेत उत्साहाचं वातावरण असायचं”, अशी आठवण त्यांनी सांगितलं (Ghulam Nabi Azad last speech of Rajya Sabha).

“गेल्या 30-35 वर्षांत अफगाणिस्तानपासून इराणपर्यंत , गेल्या काही वर्षात मुस्लिम देश एकमेकांविरोधात लढाई करत संपत आहेत. तिथे कुणी हिंदू किंवा ख्रिस्ती नाही. ते आपसातच लढत आहेत. पाकिस्तानच्या समाजात ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या आपल्या भारताच्या मुस्लिम समाजात कधीच येऊ नये”, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

“संसदेत विरोधी पक्षनेता असल्याने विरोधकांसोबत अनेकदा वाद, मतभेद झाले. मात्र, त्यागोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही वैयक्तिक अंगावर घेतल्या नाहीत. आपल्या सगळ्यांना मिळून देशाला पुढे जायचं आहे”, असं गुलाम नबी म्हणाले.

राज्यसभेत बोलताना गुलाम नबी आझाद यांना गहिवरुन आलं. काश्मीरी पंडीत आणि त्यांच्या संसदीय कार्यकाळाबाबत बोलताना ते म्हणाले,

गुजर गया वो जो छोटा सा ये फसाना था फूल थे चमन था आशियाना था न पूछ उजड़े नशेमन की दास्तां चार दिन का ही था, मगर था तो आशियाना ही था..

काश्मीरच्या सध्यस्तीतीवर बोलताना गुलाम नबी म्हणाले,

दिल ना-उमीद तो नहीं नाकाम ही तो है लम्बी है ग़म की शाम मगर शाम ही तो है

यावेळी त्यांनी त्यांच्या सहकार्याना सांगितलं, संसदेत आता भेट होणार नाही. मात्र, बाहेर नक्की भेटी होत राहतील. ते म्हणाले,

बदलेगा न मेरे बाद भी मौज़ू-ए-गुफ़्तुगू मैं जा चुका हूं फिर भी तिरी महफ़िलों में हूं

यावेळी त्यांनी राज्यसभचे सभापती आणि सदस्यांचे आभार मानले. ते अखेर म्हणाले,

नहीं आएगी याद तो बरसों नहीं आएगी, मगर जब याद आएगी तो बहुत याद आएगी

हेही वाचा : ‘मी नशीबवान, मला पाकिस्तानात जावं लागलं नाही’, निरोपाच्या भाषणात गुलाम नबी आझाद भावूक

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!