“नशिब रविकुमारची गद्दारी उघड झाली, साखरपुडा होऊनही आमची पोरगी वाचली”
चांगला नेव्ही डॉकमध्ये इंजिनिअर नोकरी करणारा मुलगा म्हणून रवीला चांगलं स्थळ आलं. त्याचा साखरपुडाही झाला, मात्र एटीएसने त्याला अटक करताच मुलीच्या घरच्यांनी त्यांचे लग्न मोडल्याचे जाहीर केले. त्याने 14 पानबुडे आणि नौकाची गुप्त माहीती ISI ला पुरवल्याचे सूत्रांनी सांगितले.

रविकुमार वर्मा याला पानबुड्या आणि युद्ध नौकांची माहीती शत्रू देशाला पुरवली म्हणून महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून खळबळजनक माहीती उघडकीस आली आहे. त्याने मुंबई डॉकयार्डमध्ये गेल्या चार वर्षांपासून ज्युनियर इंजिनिअर म्हणून काम केले. विशेष म्हणजे त्याच्या अटकेमुळे त्याचं लग्नही मोडलं आहे. नेव्हीत इंजिनियर म्हणून नोकरी करणारा मुलगा म्हणून त्याला चांगल्या ठिकाणी स्थळ आलं होतं. त्याचा साखरपुडाही झाला.पण देशाशी गद्दारी करुन आपली पाणबुड्या आणि युद्धनौकाची माहीती देणे त्याला भारी पडलं. आणि त्याचं लग्नही मोडलं…
14 पानबुड्या आणि युद्धनौकांची माहीती ISI ला दिली
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशात युट्युबर ज्योती मल्होत्रा हीच्यासह अनेक जणांना पहलगाम आणि भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर अटक केली आहे. आता डॉकयार्ड येथील इंजिनियर रविकुमार वर्मा याला महाराष्ट्र ATS ने अटक केली आहे. रविकुमार नेव्ही डॉकमध्ये जूनियर मैकेनिकल इंजीनियर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर आरोप आहे की त्याने 14 पानबुड्या आणि युद्धनौकांची माहीती पाकिस्तानी गुप्तचर संघटना एजन्सी ISIला दिली आहे.
कळवा येथील रहिवासी
रविकुमार हा ठाण्यातील कळवा येथे रहिवासी आहे. नेव्ही डॉकमध्ये तो ज्युनियर मॅकेनिकल इंजीनियर होता.रविकुमार वर्मा पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI च्या दोन फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात होता. ही दोन्ही फेसबुक पेज पायल शर्मा आणि इसप्रीत यांच्या नावाने तयार करण्यात आली आहेत. याच दोन फेसबुक पेजवर रविकुमार याने पानबुड्या आणि युद्धनौकांची माहीती शेअर केली होती. या युद्धनौकांसह त्याने इतर जहाजांची देखील महत्वपूर्ण माहीती आणि फोटो शत्रूंना पाठवले असल्याचे उघडकीस आले आहे.
पायल आणि जसप्रीत कोण ?
नेव्ही डॉक क्षेत्रात मोबाइल फोन निषिद्ध आहे. यामुळे रविकुमार वर्मा येथील युद्धनौकाचे डिझाईन आणि अन्य माहीती लक्षात ठेवायचा आणि त्यानंतर त्याचे रेखाटन काढून सर्व माहीती पायल शर्मा आणि जसप्रीत नावाच्या फेसबुक खात्यावरुन शेअर करत असायचा. ही माहीती ऑडियो आणि टेक्स्ट फॉरमॅटमध्ये तो पाठवायचा असेही चौकशीत त्याने कबुल केले आहे.
2024 पासून पाकिस्तानच्या संपर्कात
रवि वर्मा हा नोव्हेंबर 2024 पासून या पाकिस्तानी फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात होता. महाराष्ट्र ATS ने सांगितले की ही दोन्ही फेसबुस पेजच्या तो संपर्कात होता.त्याच्याकडून एका मागून एका प्रोजेक्टची माहीती मागितली जात होती. तो हनीट्रॅपमध्ये अडकला असावा.त्याने वारंवार पायल शर्मा आणि इसप्रीतला पाठवत होता असे एटीएसने सांगितले.
आमच्या मुलीचं आयुष्य वाचलं
रविचं लवकरच लग्न होणार होतं. त्याचा साखरपुडाही झाला होता. परंतू एटीएसने अटक करताच त्याची पोलखोल झाल्याने मुलीकडच्या नातेवाईकांनी हे लग्न मोडलं. काहीच दिवसांपूर्वी त्यांनं मुलगी पसंद करून साखरपुडाही केला. परंतू त्याला अटक झाल्याने बातम्या आल्यानंतर मुलीकडील नातेवाईकांनी हे लग्न मोडले. मुलीकडील लोक म्हणाले आम्ही देशाशी गद्दारी करणाऱ्या हातात आमची मुलगी देणार नाही.केवळ साखरपुडा झाला होता म्हणून बरं नाही तर आमच्या मुलीचं आयुष्य बरबाद झाले असते असे मुलीच्या पालकांनी म्हटले आहे.
